शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ना भरजरी साडी, ना महागडे दागिने, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा लग्नासाठी साधाच लूक, मंगळसूत्राच्या डिझाइनची रंगली चर्चा

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 27, 2024 | 9:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaumudi walokar new look

कौमुदी वलोकरचा लग्नानंतरचा लूक चर्चेत

मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. यातील एक भूमिका म्हणजे आरोही. ही भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती. कौमुदी तिच्या खासगी आयुष्यामुळे आता चर्चेत आली आहे. काल म्हणजे २६ डिसेंबर २०२४ रोजी ती आकाशबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटोदेखील समोर आले. तसेच काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाआधीचे विधी म्हणजे मेहंदी, हळद, संगीत असे अनेक समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांचेदेखील अनेक फोटो सोशल मीडियावर बघायला मिळाले. आता तिच्या लग्नानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (kaumudi walokar new look)

कौमुदी व आकाशचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. यावेळी कौमुदीने चिंतामणी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तसेच त्यावर मॅचिंग गुलाबी रंगाचा ब्लाऊज व गुलाबी रंगाची शाल घेतली होती. तसेच सुंदर असे उठावदार दागिनेदेखील परिधान केले होते. तसेच आकाशने फिकट पांढऱ्या रंगाचा कुर्ता, गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले होते. तसेच त्यावर मॅचिंग आणि कौमुदीच्या साडीला मॅचिंग शाल घेतली होती. दोघा नवरा-नवरीचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला.

आणखी वाचा – प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “अचानक निघून गेलास आणि…”

View this post on Instagram

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)

अशातच आता कौमुदीचा लग्नानंतरचा नवीन लूक समोर आला आहे. यामध्ये कौमुदीने सोनेरी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. त्यावर मॅचिंग अशी लाल रंगाची शालदेखील घेतली आहे. तसेच कौमुदीने खूपच नाजुक व सुंदर असे दागिने घातले आहेत. त्याचप्रमाणे तिच्या पारंपरिक दोन वाट्या असलेल्या मंगळसूत्रानेही अधिक लक्ष वेधून घेतले आहे. कौमुदीची अत्यंत सुंदर व नाजुक अशी हेअरस्टाईल दिसून येत आहे. केसांमध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या फुलांना पसंती दिली आहे. कौमुदीचा हा साधा लूक खूपच लक्षवेधी ठरला आहे.

आणखी वाचा – जॅकी श्रॉफ यांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सगळ्यांची मनं, चाहत्याला दिला मदतीचा हात, व्हीडीओ व्हायरल

त्याचप्रमाणे कौमुदीचा नवरा आकाशनेदेखील पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. त्यावर गळ्यात मोत्याची माळ, मरुन रंगाची शाल व डोक्यावर कौमुदीच्या साडीला मॅच होईल असा फेटा बांधला आहे. दोघंही एकत्रित खूप छान दिसत आहेत. तसेच त्यांच्या लूकची चर्चादेखील सोशल मीडियावर रंगलेली दिसून येत आहे.  

Tags: kaumudi walokarlookmarathi actresswedding
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
nora fatehi at ratnagiri

Video : रत्नागिरीत हळदीसाठी पोहोचली नोरा फतेही, धमाल डान्स, कोकणी पद्धतीचं जेवण अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.