मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे काल थाटामाटात शाही लग्न पार पडले. काल जिओ वर्ल्डमध्ये झालेल्या या शाही विवाहसोहळ्यात अनंत-राधिक यांनी सप्तपदी घेतल्या. दोघांच्या भव्य लग्नासाठी देश-विदेशातील मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या जोडप्याचे लग्न इतके भव्यदिव्य होते की, तो राजेशाही थाट पाहून अनेकांना राजे-महाराजांची आठवण आली. अनंत-राधिका यांच्या लग्नात अगदी बॉलिवूड, हॉलिवूडपासून अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कसलीच कमी भासू दिली नाही. अनेक दिग्गज व बड्या कलाकारांना लेकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले असून अनेकांनी या लग्नसोहळ्याला खास हजेरी लावत चार चाँद लावले आहेत. राजकारण, मनोरंजन, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली आहे. तसेच भारतीय संगीत क्षेत्रातील मातब्बर लोकांनीदेखील अंबानींच्या लेकाच्या लग्नात खास उपस्थिती लावली आहे. या संगीत क्षेत्रातील मान्यवर लोकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
सुप्रसिद्ध व लोकप्रिय मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास सादरीकरण केले. याशिवाय शंकर महादेवन, हरिहरन, सोनू निगम यांच्यासह गायिका श्रेया घोशाल आदी सांगीतिक मंडळींनी अनंत व राधिका यांच्या लग्नात गायनसेवा केली. अनंत व राधिका यांच्या लग्नात अजय-अतुल यांचे संगीत असलेल्या व शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘श्रीगणेशाय धिमही’ या गाण्याचे खास सादरीकरण करण्यात आले. शंकर महादेवन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडीओद्वारे अनंत व राधिका यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
आणखी वाचा – Video : नवरदेवापेक्षा रणवीर सिंहच उत्साही, भर लग्नात अभिनेत्याचा भन्नाट डान्स, सगळे बघतच बसले अन्…
दरम्यान, अनंत राधिकाच्या लग्नासाठी किम कार्दशियन, जॉन सीना, निक जोनास, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, सलमान खान, रणवीर सिंग, कतरिना कैफ, विकी कौशल आणि संजय दत्त यांसारखे स्टार्स आले होते. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छाही दिल्या.