बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवरदेवापेक्षा रणवीर सिंहच उत्साही, भर लग्नात अभिनेत्याचा भन्नाट डान्स, सगळे बघतच बसले अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 13, 2024 | 11:35 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Ranveer Singh dancing on the song Mujhse Shaadi Karogi at Anant-Radhika's wedding video viral on social media.

Video : नवरदेवापेक्षा रणवीर सिंहच उत्साही, भर लग्नात अभिनेत्याचा भन्नाट डान्स, सगळे बघतच बसले अन्…

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची सर्वच प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती, तो लग्न सोहळा अखेर पार पडला आहे. काल मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दोघेही विवाहबंधनात अडकले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेला हा विवाह अनेक वर्षे स्मरणात राहील. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. काल रात्री या जोडप्याने एकमेकांबरोबर सप्तपदी घेतली.  या लग्नाला देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित होते. यादरम्यान अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीत बड्या सेलिब्रिटींनी भरपूर डान्स केला.

अशातच या लग्नातील एका अभिनेत्याकया डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि हा अभिनेता म्हणजे रणवीर सिंह. रणवीर सिंह हा बॉलिवूडचा एनर्जीटीक स्टार म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्या एनर्जीच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. अशातच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातील खास डान्समुळेही त्याने सर्वांचेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनीदेखील पसंती दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aks (@mera_aks2020)

आणखी वाचा – मोठा वाद?, बच्चन कुटुंबीयांची वेगळी एण्ट्री, ऐश्वर्या बच्चन लेकीला घेऊन एकटीच आली अन्…; नक्की घडलंय काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रणवीर सिंहच्या व्हिडीओमध्ये तो डीजे चेतासबरोबर दमदार परफॉर्मन्स करताना दिसत आहे. रणवीर सिंहचा हा धमाकेदार डान्स पाहून अनंत अंबानीचे लग्न नसून त्याचेचं लग्न झालं आहे की काय असंच म्हणावं लागेल. रणवीरने सलमान खानच्या चित्रपटातील ‘मुझसे शादी करोगी’ या गाण्यावर धमाकेदार  डान्स केला आहे. रणवीर सिंहची धमाकेदार डान्सशैली या गाण्याशी अगदीच जुळत असून त्याच्या या डान्समुळे लग्नाला आणखी चार चाँद लागले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आणखी वाचा – “शक्तिमान, अलादीन, अलीबाबा अन्…”, अनंत अंबानीच्या लग्नावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाला, “जॉन सिनाही आला आता…”

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे सर्व विधी मध्यरात्री १२.३० दरम्यान पूर्ण झाले. वधू-वरांच्या लुकबद्दल सांगायचं झालं तर अनंत अंबानी लाल रंगाच्या शेरवानीमध्ये होता, तर ऑफ व्हाईट रंगाचा लेहंगा आणि त्यावर लाल रंगाने केलेले वर्क यामध्य नववधू राधिका अप्रतिम दिसत होती. अंबानी कुटुंबाची धाकटी सून लाल दुपट्ट्यासह पांढऱ्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती. गुजराती वधूचा लूक तिला खूप शोभत होता.

Tags: Anant Ambani Radhika Merchant MarriageBollywood entertainment newsranveer singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Shahrukh Khan

याला म्हणतात संस्कार! अमिताभ व जया बच्चन समोर येताच शाहरुख खान पाया पडला अन्…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.