बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video :  अनंत अंबानीच्या लग्नात अजय-अतुल यांनी सादर केलं मराठी गाणं, परदेशातील मंडळीही भारावून गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 13, 2024 | 1:25 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi music composers Ajay-Atul performed the song Shreeganeshay Dheemahi at Anantha-Radhika's wedding and Hariharan, Shankar Mahadevan, Sonu Nigam and Shreya Ghoshal were also present on this occasion.

Video : अनंत अंबानीच्या लग्नात अजय-अतुल यांनी सादर केलं मराठी गाणं, परदेशातील मंडळीही भारावून गेली अन्...; व्हिडीओ व्हायरल

मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे काल थाटामाटात शाही लग्न पार पडले. काल जिओ वर्ल्डमध्ये झालेल्या या शाही विवाहसोहळ्यात अनंत-राधिक यांनी सप्तपदी घेतल्या. दोघांच्या भव्य लग्नासाठी देश-विदेशातील मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या जोडप्याचे लग्न इतके भव्यदिव्य होते की, तो राजेशाही थाट पाहून अनेकांना राजे-महाराजांची आठवण आली. अनंत-राधिका यांच्या लग्नात अगदी बॉलिवूड, हॉलिवूडपासून अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कसलीच कमी भासू दिली नाही. अनेक दिग्गज व बड्या कलाकारांना लेकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले असून अनेकांनी या लग्नसोहळ्याला खास हजेरी लावत चार चाँद लावले आहेत. राजकारण, मनोरंजन, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली आहे. तसेच भारतीय संगीत क्षेत्रातील मातब्बर लोकांनीदेखील अंबानींच्या लेकाच्या लग्नात खास उपस्थिती लावली आहे. या संगीत क्षेत्रातील मान्यवर लोकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “शक्तिमान, अलादीन, अलीबाबा अन्…”, अनंत अंबानीच्या लग्नावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाला, “जॉन सिनाही आला आता…”

सुप्रसिद्ध व लोकप्रिय मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास सादरीकरण केले. याशिवाय शंकर महादेवन, हरिहरन, सोनू निगम यांच्यासह गायिका श्रेया घोशाल आदी सांगीतिक मंडळींनी अनंत व राधिका यांच्या लग्नात गायनसेवा केली. अनंत व राधिका यांच्या लग्नात अजय-अतुल यांचे संगीत असलेल्या व शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘श्रीगणेशाय धिमही’ या गाण्याचे खास सादरीकरण करण्यात आले. शंकर महादेवन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडीओद्वारे अनंत व राधिका यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : नवरदेवापेक्षा रणवीर सिंहच उत्साही, भर लग्नात अभिनेत्याचा भन्नाट डान्स, सगळे बघतच बसले अन्…

दरम्यान, अनंत राधिकाच्या लग्नासाठी किम कार्दशियन, जॉन सीना, निक जोनास, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, सलमान खान, रणवीर सिंग, कतरिना कैफ, विकी कौशल आणि संजय दत्त यांसारखे स्टार्स आले होते. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छाही दिल्या.

Tags: Ajay-AtulAnant Ambani Radhika Merchant Weddingmarathi entertainment newsMusic Composers
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Amitabh Bachchan Pens Note

ऐश्वर्या राय लेकीसह बच्चन कुटुंबियांपासून कायमची वेगळी?, वाद चव्हाट्यावर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, "काही नाती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.