मंगळवार, जून 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठीमध्ये नव्या चित्रपटाची घोषणा, ‘सजना’चं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 25, 2025 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi movie song

'सजना' चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजाने चार चाँद

सध्या मराठीमध्ये नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी तर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. अशातच आता आणखी एक मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘सजना’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं टायटल गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या आवाजाने चार चाँद लागले आहेत. त्यांनी हे गाणं गायलं आहे. ‘सजना’च्या टायटल गाण्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘सजना’च्या गाण्यामध्ये प्रेमाचा गोडवा आहे. नात्यातील प्रेमळ क्षण, हळूवार फुलत जाणारं नातं किती सुंदर असतं हे या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोनू निगम आणि राजेश्वरी पवारच्या आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक भावना व्यक्त करते. ओंकारस्वरुप यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं सुंदर चित्रण आहे. गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – “थायरॉइड, गुडघ्याची गादी फाटली, उठायलाही त्रास अन्…”, सुकन्या मोनेंचा आजारपणाचा काळ, म्हणाल्या, “महिनाभर झोपूनच…”

आणखी वाचा – “पैसे घेऊन अंबानींच्या लग्नात नाचले त्यांना काश्मीरमध्ये आणून…”, पहलगाम हल्ल्याबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे सरकारला सवाल

‘सजना’ ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. ‘सजना’ हा नवा चित्रपट २३ मे २०२५ ला चित्रपटगृहांत दाखल होईल.

Tags: entertainment newsmarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
UPSC Result,success

Video : मेंढपाळाच्या पोरानं करुन दाखवलं, IPS अधिकारी बनला, गरिबी अनुभवल्यानंतर सुखाची भाकरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.