प्रत्येक व्यक्तीनुसार प्रेमाची परिभाषा बदलत असते. एखादी व्यक्ती जेव्हा प्रेमात पडते तेव्हा त्याला प्रेमाचा अर्थ खऱ्या अर्थाने कळतो. प्रेम म्हणजे नक्की काय?, प्रेमाचा अर्थ समजावणारे बरेच चित्रपट आजवर प्रदर्शित झाले. आता याच विषयावर आधारित एक नवा चित्रपट मराठीत प्रदर्शित होत आहे. आगळीवेगळी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माझी प्रारतना’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
येत्या ९ मे २०२५ ला ‘माझी प्रारतना’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरजंनाची मेजवानी ठरेल. प्रेम, प्रेमातील विश्वासघात आणि त्या बिकट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.
‘माझी प्रारतना’ चित्रपट ब्रिटिश काळात, महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेली संगीत प्रधान प्रेमकथा आहे. आयुष्यात किती ही अडचणी असल्या तरी प्रेम मात्र जीवनात सर्वकाही जिंकण्याची ताकद आहे हे पटवून देणारी ही कथा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत ‘माझी प्रारतना’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केलं आहे. पद्माराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वजित सी टी यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. चित्रपटाचं पोस्टर, टिझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.