टेलिव्हीजनवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेमधील सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली आहे. जेठालाल, दयाबेन, बापुजी, टप्पू अशा अनेक व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. यामधील या शोमधील प्रत्येक कलाकाराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हा शो दिशा वाकानीपासून शैलेश लोढापर्यंत सोडण्यापर्यंत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. लहान टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी हा अधिक चर्चेत राहला. त्याने अनेक वर्ष काम केल्यानंतर या मालिकेला रामराम केला. (bhavya gandhi new movie)
भव्य आता २७ वर्षांचा झाला आहे. जेव्हा भव्यने मालिका सोडली तेव्हा तो नऊ-दहा वर्षांचा होता. त्याला या मालिकेतील भूमिकेसाठी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्याने अनेक गुजराती मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र सध्या त्याच्याबद्दलची नवीन अपडेट समोर आली आहे. ‘पिंकविला’बरोबर भव्यने त्याच्या आगामी कामाबद्दल सांगितले आहे. सध्या त्याचा ‘ओम स्वीट ओम’ या गुजराती चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. सध्या याचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु आहे.
तसेच त्याने बोलताना सांगितले की, “मी एक ऐतिहासिक चित्रपट करत आहे. ‘केसरी वीर’ असे चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय व सूरज पंचोलीदेखील दिसणार आहेत”. सध्या तो त्याचे काम खूप एंजॉय करताना दिसत आहे. तसेच त्याला आता विविध भूमिका करायच्या असल्याचेदेखील त्याने सांगितले आहे.
आणखी वाचा – प्रियांका चोप्राच्या दीराचा घटस्फोट, अखेर पाच वर्षांनी जो जोनास व सोफी टर्नर विभक्त
तसेच भव्य आता ‘पुष्पा इम्पॉसिबल’ यामालिकेमध्ये प्रभासच्या मनोरुग्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेमध्ये भव्य पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. मालिकेत, भव्य पुष्पा आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात धोका म्हणून प्रवेश करतो. बदला व विध्वंसाच्या शोधात असलेल्या मनोरुग्ण विरोधी असे पात्र टप्पूच्या त्याच्या पूर्वीच्या निरागस व खोडकर भूमिकेपेक्षा खूप वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता टप्पू म्हणजेच भव्य वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.