‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. या मालिकेत त्याने मुख्य भूमिकेत असणाऱ्या इंद्राच्या भावाची भूमिका केली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे ऋतुराजने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं. याशिवाय ऋतुराज ‘धर्मवीर’ या लोकप्रिय मराठी चित्रपटातूनही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावरही ऋतुराज बऱ्यापैकी सक्रिय असतो. (Ruturaj Phadke Video)
ऋतुराजचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्याला नेहमीच त्याच्या चाहत्यांकडून प्रेम मिळत असतं. सोशल मीडियावरुन ही ऋतुराज नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच ऋतुराज सध्या चित्रीकरणातून ब्रेक घेत स्वतःसाठीच क्वालिटी टाइम घालवत आहे. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या ऋतुराज त्याच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत कोकणात रमला आहे.
कोकणातील शेती करतानाचे खास फोटो ऋतुराजने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो भातशेती करताना दिसत आहे. “शेती इकायची नसते शेती राखायची असते. कोकणातल्या भात शेतीला सुरुवात”, असं कॅप्शन देत ऋतुराजने खास शेतात काम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. कोकणात भातशेती करण्यात ऋतुराज रमला असून तो त्याच्या गावी एन्जॉय करत आहे. ऋतुराजच खेड दापोली हे गाव आहे. नेहमीच तो कोकणातील अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.
ऋतुराजला शेती करताना पाहून चाहत्यांनीही त्याच्या या फोटोंना पसंती दर्शविली आहे. इतकंच नव्हे तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे. “अरे वा कार्तिक आणि शेती भारी वाटलं रे एकदम दा मस्त कोणतं गाव आहे?”, “छान वाटले बघून गावची आठवण झाली कोकण म्हणजे जणू स्वर्ग”, असा कमेंट करत कौतुक केलं आहे.