रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता कोकणातल्या गावी करत आहे भातशेती, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “शेती विकायची नसते तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Ruturaj Phadke Video

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता कोकणातल्या गावी करत आहे भातशेती, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, "शेती विकायची नसते तर... "

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋतुराज फडके. या मालिकेत त्याने मुख्य भूमिकेत असणाऱ्या इंद्राच्या भावाची भूमिका केली होती. या नकारात्मक भूमिकेमुळे ऋतुराजने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं. याशिवाय ऋतुराज ‘धर्मवीर’ या लोकप्रिय मराठी चित्रपटातूनही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावरही ऋतुराज बऱ्यापैकी सक्रिय असतो. (Ruturaj Phadke Video)

ऋतुराजचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्याला नेहमीच त्याच्या चाहत्यांकडून प्रेम मिळत असतं. सोशल मीडियावरुन ही ऋतुराज नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच ऋतुराज सध्या चित्रीकरणातून ब्रेक घेत स्वतःसाठीच क्वालिटी टाइम घालवत आहे. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या ऋतुराज त्याच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत कोकणात रमला आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारला करोना, दोन दिवसांपासूनच होता आजारी, अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाला येण्यासही नकार

View this post on Instagram

A post shared by Ruturaj Phadke (@ruturajphadke)

कोकणातील शेती करतानाचे खास फोटो ऋतुराजने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो भातशेती करताना दिसत आहे. “शेती इकायची नसते शेती राखायची असते. कोकणातल्या भात शेतीला सुरुवात”, असं कॅप्शन देत ऋतुराजने खास शेतात काम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. कोकणात भातशेती करण्यात ऋतुराज रमला असून तो त्याच्या गावी एन्जॉय करत आहे. ऋतुराजच खेड दापोली हे गाव आहे. नेहमीच तो कोकणातील अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.

आणखी वाचा – “मालिका बंद करा”, अर्जुनने अप्पीच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने भडकले प्रेक्षक, म्हणाले, “ओव्हर करतात आणि…”

View this post on Instagram

A post shared by Ruturaj Phadke (@ruturajphadke)

ऋतुराजला शेती करताना पाहून चाहत्यांनीही त्याच्या या फोटोंना पसंती दर्शविली आहे. इतकंच नव्हे तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे. “अरे वा कार्तिक आणि शेती भारी वाटलं रे एकदम दा मस्त कोणतं गाव आहे?”, “छान वाटले बघून गावची आठवण झाली कोकण म्हणजे जणू स्वर्ग”, असा कमेंट करत कौतुक केलं आहे.

Tags: marathi actorruturaj phadkeruturaj phadke kokanRuturaj Phadke Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Wedding

Video : जिओ सेंटरमध्ये पोहोचलं अंबानींचं वऱ्हाड, महागड्या गाड्या रस्त्यावर धावल्या अन्…; सूनेपेक्षा नीता अंबानींचा लूकच ठरला लक्षवेधी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.