सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मालिका बंद करा”, अर्जुनने अप्पीच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने भडकले प्रेक्षक, म्हणाले, “ओव्हर करतात आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2024 | 3:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector Serial Troll

"मालिका बंद करा", अर्जुनने अप्पीच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास नकार दिल्याने भडकले प्रेक्षक, म्हणाले, "ओव्हर करतात आणि..."

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अमोलच्या शब्दाखातर अप्पी व अर्जुन एकत्र आलेले असतात. अप्पी व अर्जुन एकत्र यावेत म्हणून अमोल खूप प्रयत्न करत असतो. हे प्रयत्न अप्पीच्या लक्षातही येतात. अमोलच्या या प्रयत्नांना यश यावे आणि त्याला आई-बाबा मिळावेत यासाठी अप्पी अर्जुनकडे त्यांच्यातील प्रेमाबाबत भाष्य करते. अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकत्र राहत असले तरी ते दोघे मनाने एकमेकांपासून केव्हाच दूर गेले आहेत. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विसर अद्याप अर्जुनला पडलेला नाही. सात वर्षांपूर्वी अपर्णाने केलेली चूक त्याच्या मनात सात वर्ष सलत राहिली. त्यामुळे अप्पीला तो कधीही माफ करायला तयार नाही. (Appi Amchi Collector Serial Troll)

मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अप्पी अर्जुनला विचारते, “आपण अमोलसाठी एकत्र राहतोय तर आपल्यात पुढे काही होऊ शकणार नाही का?, अमोलला असं वाटत आहे की आपण प्रेमाने एकत्र राहावं”, यावर अर्जुन स्पष्ट बोलतो, “अप्पी तुला नेमकं काय बोलायचं आहे?, मी तुला स्पष्टच सांगतो, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत”.

आणखी वाचा – “त्याने माझा प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितले अन्…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्याला…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अर्जुनने अप्पीचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. यावरुन आता नेटकऱ्यांनीही अप्पीची बाजू घेत अमोलला दोषी ठरवलं आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेला ट्रोलही केलं आहे. एका नेटकऱ्याने, “जर काय होऊच शकत नाही तर मग सगळं कुटुंब घेऊन तिच्याकडे कशाला राहायला आले आहेत. सरळ सरळ त्या अमोलला काय खर आहे ते सांगा आणि नसेल जमत तर मग बंद करा मालिका उगाच काहीही दाखवतात”, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “फालतूपणा आहे. अर्जुन जरा ओव्हर करत आहे. आता मालिका लांबवतात”, असं म्हणत अर्जुनला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा – Video : राधिकाने अनंत अंबानीला वरमाला घालताच रडू लागले वडील, ‘त्या’ क्षणी उपस्थितांचेही पाणावले डोळे, Inside Video समोर

इतकंच नव्हे तर “मग प्रेम नाही तर कशाला अमोलचा बाबा होत आहेस. मूर्ख माणसा तू तुझ्या त्या नव्या बायकोकडे जा. उगाच मालिका वाढवून आमचाही वेळ वाया घालवत आहात”, “नको येऊ एकत्र तुझी लायकीच ती आहे. पण अप्पी चांगली आहे आणि अर्जुनच्या हातात कॅडबरी असूनही तो फालतू आर्यासारख्या बिस्किटाचा विचार करत आहे”, “अर्जुन व अप्पी दोघेही मंद आहेत. लग्न झालेल्या जोडप्याचे काय उदाहरण आहे. सात वर्षात एकदाही अर्जुनने बायको व मुलाला शोधलं नाही वा काही संपर्क केला नाही. आता परत समोर आले तर एवढी नाटक करत आहेत”, अशा अनेक कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे.

Tags: Appi Amchi CollectorAppi Amchi Collector Serial Trollmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Akshay Kumar Corona Positive

अक्षय कुमारला करोना, दोन दिवसांपासूनच होता आजारी, अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाला येण्यासही नकार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.