मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे सध्या खूप चर्चेत आली आहे. ऋतुजाने आजवर अनेक मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अनन्या नाटकामुळे ती अधिक चर्चेत राहिली आहे. या नाटकातील तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. या भूमिकेसाठी तिला आता संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने पुरस्काराबरोबर तिचे काही फोटो शेअर करत कॅप्शनदेखील दिले असून तिचा आनंद तिचे व्यक्त केला आहे. ऋतुजाने पोस्टमध्ये नक्की काय लिहिलं आहे? ते आपण आता जाणून घेऊया. (rurtuja bagwe award )
ऋतुजाने पुरस्काराच्या मानचिन्हाबरोबर फोटो शेअर केला आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले की, “उस्ताद बिस्मिल्लाह खा युवा पुरस्कार २०२३ (रंगमंच अभिनय) संगीत नाटक अकादमी. मी नाटकवेडी, तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं विचारल्यावर मी नाटक असं क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते. इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं. मनात आलं की आपण फार काम केलं नाही. या पुरस्कारासाठी मी खरंच पात्र आहे का? २२ एकांकिका, २ प्रायोगिक नाटकं, ३ व्यावसायिक नाटकं पण जे काम केलं ते जीव ओतुन काम केलं एव्हडं मात्र नक्की”.
पुढे तिने लिहिले की, “माझ्या कामाची दखल जेव्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते तेव्हा तो आनंद आत्मा सुखावणारा असतो आणि यात ‘अनन्या’ नाटकाचा मोलाचा वाटा आहे. ‘अनन्या’ नाटकाचे मी ३०० प्रयोग केले. या नाटकाने मला कौतुक, पुरस्कार, समाधान, प्रसिद्धी , पैसा, मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम खुप काही दिलं. आज हा पुरस्कार मी ‘अनन्या’ला आणि माझ्या ‘अनन्या’च्या संपूर्ण टीमला समर्पित करते”.
नंतर त्यामध्ये तिने लिहिले की, “सर्व तिरस्कार करणाऱ्या, ट्रोलर्स व ज्यांनी माझा अनादर केला तसेच ज्यांनी मी पुढे जाणार नाही असं म्हंटलं त्या सर्वांना खूप धन्यवाद. मी माझे कुटुंबं, मित्र, हितचिंतक, तसेच मला ज्यांनी पाठिंबा दिला आणि विश्वास ठेवला त्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं त्यांची मी कायम ऋणी राहीन. खूप प्रेम”. दरम्यान तिने तिचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.