शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सरप्राइज, साडी दिली, डान्सही केला अन्…; रवी जाधव यांनी त्यांच्याच घरी छाया कदम यांचं केलं जंगी स्वागत, बायकोनेही केला पाहुणचार आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2024 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ravi Jadhav On Chhaya Kadam

सरप्राइज, साडी दिली, डान्सही केला अन्…; रवी जाधव यांनी त्यांच्याच घरी छाया कदम यांचं केलं जंगी स्वागत, बायकोनेही केला पाहुणचार आणि…

जगभरात सर्वत्र यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ची चर्चा सुरु आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताने बाजी मारली. कान्समुळे गेल्या काही दिवसांत मराठी सिनेसृष्टीतील एक नाव समोर आलं आहे.ते चर्चेत आलेलं नाव म्हणजे छाया कदम. अभिनेत्री छाया कदम यांच्या कामाचं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत जोरदार कौतुक होतं आहे. पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ चित्रपटाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरव झाला आणि छाया कदम यांच्या भूमिकेचं कौतुक झालं. (Ravi Jadhav On Chhaya Kadam)

भारतात परतल्यानंतरही छाया कदम यांचं भारतवासीयांनी स्वागत करत त्यांच्या कामाची दखल घेतली. सोशल मीडियावर छाया कदम चर्चेत आलेल्या पाहायला मिळत आहेत. अशातच छाया कदम यांच्या या यशाचं सेलिब्रेशन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव यानेही साजरं केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. रवी याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रवी आणि त्याच्या कुटुंबीयांनी छाया कदमला घरी बोलावून तिचं स्वागत केलं आहे.

आणखी वाचा – “माझा मंत्र जप सुरु होता आणि…”, ‘त्या’ प्रसंगी सुकन्या मोनेंना आली स्वामींची प्रचिती, स्वतःच सांगितली घटना, म्हणाल्या, “धावत धावत गेले…”

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

छाया यांना घरी बोलावून जाधव कुटुंबीयांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केलं आहे. शिवाय तिला भेटवस्तू म्हणून साडीही दिली आहे. यावेळी त्यांनी एन्जॉय केलेलंही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “अनुसया सेनगुप्ता, पायल कपाडिया, चिदानंद एस नाईक, मानसी माहेश्वरी आणि आमच्या हक्काच्या छाया कदम यांच्या उल्लेखनीय कलागुणांचा गौरव करुन आम्ही ‘कान्स २०२४’ मधील उल्लेखनीय कामगिरीचा आनंद उत्सवात एकत्र आलो आहोत. या व्यक्तीने भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. तसेच भारतीय चित्रपट निर्मितीच्या जगात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली”.

आणखी वाचा – अरुण कदमांची लेक व जावयाने ठाण्यामध्ये सुरु केलं स्वतःचं मोठं रेस्टॉरंट, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, नावही ठेवलं फारच खास

पुढे त्याने लिहिलं आहे की, “विशेषत: आपल्या प्रिय असलेल्या छाया यांच्या माध्यमातून आम्ही सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या समर्पण, सर्जनशीलता आणि उत्कटतेने केवळ प्रतिष्ठित प्रशंसाच मिळवली नाही तर इंडी चित्रपट समुदायाला प्रोत्साहन दिले. भविष्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी या यशाने दरवाजे उघडले आणि मार्ग प्रकाशित केले आहेत.जागतिक सिनेमॅटिक लँडस्केपवर त्यांनी केलेले सखोल प्रभाव ओळखून आपण त्यांचे यश आनंदाने व अभिमानाने साजरे करुया”.

Tags: chhaya kadamentertainmentmarathi actressravi jadhavRavi Jadhav On Chhaya Kadam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
"आपणच याला जबाबदार आहे का?", पाणीटंचाईमुळे भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, 'ते' दृश्य पाहून म्हणाली, "कोणी का बोलत नाही?"

"आपणच याला जबाबदार आहे का?", पाणीटंचाईमुळे भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, 'ते' दृश्य पाहून म्हणाली, "कोणी का बोलत नाही?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.