नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा निर्णय उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या मुलाखतीच्या निकालाकडे लागून राहिले आहे. अशातच जगभरातून इस्रायलला मोठा विरोध होत आहे. त्यात अनेक निष्पाप, निपराध नागरिक लहान मुलं, महिला यांना आपले प्राण गमवावे लागले. याबद्दल अनेक नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. यात सध्या मुंबईसह संपूर्ण देशातील पाणी टंचाईची समस्याही भेडसावत आहे.
यावर ‘माझा होशील ना?’ फेम मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गौतमीने तिच्या सोशल मीडियाद्वारे याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे. गौतमीने “भारतातील उष्मा आणि सर्वात वाईट हवामान संकटामुळे दिल्लीतील गरीबांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे” असं लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे आणि याच पोस्टवर तिने “आपण याला जबाबदार आहोत का?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
तसेच यापुढे तिने “आपण सर्व युद्ध, निवडणूक आणि इतर अनेक मुद्द्यांवर बोलतो? पण तुम्हाला काही सांगू का??? पाणी टंचाई ही सध्या सर्व मानव जातीसाठी ही सर्वात मोठी समस्या आहे. आपण पाण्याच्या परिस्थितीबद्दल का बोलत नाही?. आपण शहरात राहतो त्यामुळे ] आपल्याला निदान ३-४ दिवसांनी पाणी मिळते तरी, पण कल्पना करा, काही भागातील नागरिकांना १५ दिवसांतून फक्त एकदा पाणीपुरवठा होत आहे”.
दरम्यान, गौतमी व विराजसची ‘माझा होशील ना?’ ही मालिका चांगलीच गाजली होती. यान मालिकेनंतर या दोघांचे ‘गालिब’ हा नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. गौतमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.