Bharat Ganeshpure Video : ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीने आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. भारत गणेशपुरे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत आपला ठसा उमटवला आहे. वैदर्भीय भाषा घराघरात पोहचवणारा हा कलाकार नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडतो. भारतने आजवर त्यांच्या बोलीभाषेतील विनोदी शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विनोदी रिऍलिटी शोबरोबरच भारतने आजवर अनेक चित्रपटांमधूनही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम बंद झाल्यापासून भारत गणेशपुरे कुठे आहेत हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. अनेकजण अभिनेत्याच्या आठवणीत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’नंतर भारत नेमका कुठे आहे हा प्रश्न अनेकांना सतावत होता. अशातच प्रेक्षकांचा लाडका हा अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच भारत सध्या त्यांच्या गावी शेती करत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. भारत गणेशपुरे हे मूळचे विदर्भातील आहेत. त्यामुळे बरेचदा ते विदर्भीय भाषेत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. आता कामातून थोडासा ब्रेक घेत अभिनेता त्याच्या मूळगावी पोहोचला आहे.
आणखी वाचा – “लोकांचे जीव जात आहेत आणि…”, मांजामुळे तरुण मुलाचा मृत्यू, जितेंद्र जोशी भडकला, म्हणाला, “हिंदू सण…”
भारतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारत गावाकडे जाऊन शेती करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात गहू या पिकाची शेती केली आहे. भारतने त्याच्या शेतात गहू पिकवला असून ते अधून मधून शेती, घर पाहण्यासाठी त्यांच्या गावी जात असतात असं व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये भारत यांचं खूप मोठं शेतही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “आशूची किती लग्न दाखवतात?”, ‘शिवा’ मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “बाजार मांडलाय…”
भारत यांनी हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “नमस्कार. तुम्ही मला नेहमी विचारता सारखा सारखा गावी का जातो?. तर हे पाहा. हे सुख, समृद्धी पाहायला गावी यावं लागतं. आता शेतात गहू पेरला आहे. आता साधारण एका महिन्याने हा गहू घरच्या ताटात येऊ शकतो, गहू पूर्ण झाल्यावर मी एखादी झलक तुम्हाला नक्की दाखवेन”.