गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळीही गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार मंडळींच्या घरी गणरायाचे आगमन झाले असल्याचं पाहायला मिळालं. तर काही कलाकार मंडळी परदेशातून भारतात गणेशोत्सवासाठी आलेले दिसले. अशातच टेलिव्हिजनवर कार्यरत कलाकार जोडीच्या गणेशोत्सवातील एक सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. ही जोडी म्हणजे अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर. आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन आपलं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केले आहे. (suruchi adarkar and piyush ranade celebrates ganeshotsav)
गणेशोत्सवातील सुंदर असा एक व्हिडीओ सुरुचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुरुची व पियुष त्यांचा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. गणपती बाप्पांसाठी मोदक करत असतानाचा व्हिडीओ सुरुचीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुची व पियुष दोघे एकत्र मिळून बाप्पासाठी खास उकडीचे मोदक करताना दिसत आहेत. खास या सणासाठी सुरुचीने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
सुरुचीने हा व्हिडीओ पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया! बाप्पा, तुझ्या येण्याने सुख, समृद्धी, आरोग्य, शांती लाभले आहे. असंच सगळ्यांनी आनंदी आणि समाधानी रहावं हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तुझा आशीर्वाद असाच कायम असू दे. पियुष तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस. माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी तू बरोबरीने माझ्या बरोबर उभा असतोस. सगळी कामं वाटून बरोबरीने करतोस. माझ्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर तितकाच सहभाग दाखवतोस म्हणून खूप प्रेम”.
लग्नानंतर पियुष व सुरुची बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली. लग्नानंतर दोघांचा सुखी संसार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सुरुची व पियुष यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. शाही थाटामाटात व अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला.