Ankita Walavalkar Video : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पाचव्या पर्वातील सर्व स्पर्धकांची विशेष चर्चा असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने हवा केली. ‘बिग बॉस मराठी’च्या विजेते पदावरही सूरज चव्हाण या रील स्टारने आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस’ आता संपलं असलं तरी या स्पर्धकांची सर्वत्र क्रेज असलेली पाहायला मिळतेय. सोशल मीडियावरही स्पर्धक मंडळी विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळतात. ‘बिग बॉस’मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अंकिता वालावलकर हे नाव देखील घराघरात पोहोचलं. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात असताना पासूनच तिच्या स्वभावानं, स्पष्टवक्तेपणाने, मनमिळाऊपणाने प्रेक्षकांची मन जिंकली.
सोशल मीडियावरही अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कोकणी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या अंकिताने अनेक रील व्हिडीओ बनवत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात असताना पासूनच तिच्या होणाऱ्या जोडीदाराची चर्चा सुरु होती. ‘बिग बॉस’बरोबरच अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही विशेष चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. अंकिताचा होणारा जोडीदार कोण आहे याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असताना अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं. अंकिताने जोडीदारासाठी खास पोस्ट शेअर करत लवकरच ते लग्न करणार असल्याची घोषणा देखील केली.
आणखी वाचा – सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाचा पहिला फोटो समोर, आई-वडिलांनी दाखवली झलक, लूक पाहून नेटकरी हैराण
अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंड कुणाल भगत हा सिनेविश्वात सक्रिय आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह अंकिता वालावलकरचे सूर जुळलेत. अनेक गाणी, चित्रपट, टीव्ही मालिकांचे संगीत दिग्दर्शन कुणालने केलंय. अंकिता व कुणाल ‘बिग बॉस’नंतर अनेकदा एकत्र फिरताना दिसले. सोशल मीडियावर ते एकत्र त्यांचे व्हिडीओदेखील शेअर करताना दिसतात. अशातच अंकिताने कुणालला खास भेटवस्तू दिलेली पाहायला मिळाली. अंकिताने कुणालसाठी एक महागडी भेटवस्तू दिली असल्याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर या महागड्या भेटवस्तूची कुणालला किंमत नसल्याचं म्हणत तिने त्याला टोकलं आहे.
कुणालला अंकिताने महागडा फोन भेटवस्तू म्हणून दिला आहे. तर हा महागडा फोन त्याने त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवला आहे. याचा एक व्हिडीओ काढून अंकिताने दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने केलेल्या तक्रारीनंतर कुणाल नुसताच हसताना दिसत आहे.