बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दिवसाला ६० सिगारेट आणि दारु…”, व्यसनाच्या आहारी गेलेले नाना पाटेकर, म्हणाले, “वासामुळे माझ्या गाडीत…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 24, 2024 | 3:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi and Bollywood actor Nana Patekar revealed he smokes around 60 cigarettes in a one day.

“दिवसाला ६० सिगारेट आणि दारु...”, व्यसनाच्या आहारी गेलेले नाना पाटेकर, म्हणाले, “वासामुळे माझ्या गाडीत...”

आपल्या दमदार अभिनयाने व साध्या राहणीमानाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत कायम चर्चेत राहणारं एक नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करत नानांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन केलं आहे. साधं राहणीमान, असाध्य दर्जाचा अभिनय ही नाना पाटेकर यांची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या कठोर, बेधडक व बिनधास्त व्यक्तव्यांमुळे नाना कायमच चर्चेत राहिले आहेत.

अशातच त्यांनी नुकतीच ‘द लल्लनटॉप’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या व्यसनाबद्दलही सांगितले. याबद्दल बोलताना नाना पाटेकरांनी असं म्हटलं की, “मला सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. अंघोळ करतानाही मी सिगारेट ओढायचो. त्यावेळी मी दिवसाला सुमारे ६० सिगारेट ओढत असे. वासामुळे माझ्या गाडीत कोणी बसत नव्हते”.

View this post on Instagram

A post shared by Nana Patekar (@iamnanapatekar)

आणखी वाचा – “आता इंग्रजी गाणी का गाते?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मराठी गाणी…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी कधीच दारु प्यायलो नाही, पण धूम्रपान भरपूर करायचो. पण, माझ्या बहिणीच्या काही शब्दांनी मला या वाईट व्यसनातून कायमची मुक्ती दिली”. माझ्या बहिणीने तिचा एकुलता एक मुलगा गमावला होता. त्यामुळे एके दिवशी बहिणीने मला धूम्रपान केल्यानंतर खोकताना पाहिले आणि तिने मला “आणखी काय बघायचे आहे?” असं विचारलं. तिचे ते शब्द ऐकून मी खूप दुःखी झालो आणि त्याच दिवसापासून मी सिगारेट सोडली”.

आणखी वाचा – आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”

दरम्यान, ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नं. 9211’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी अनेक उत्कृष्ट कलाकृती सिनेसृष्टीला दिल्या आहेत. नाना पाटेकरांनी अभिनयाबरोबर आपल्या स्पष्टवक्तेपणाने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच त्यांच्या या व्यक्तव्याचीही सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newsnana patekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update Akshara and Adhipati facing a new challenge.

भुवनेश्वरीने दिलेले चॅलेंज अधिपती-अक्षरा पूर्ण करणार का?, एन्जॉय करत दोघांचाही सुरु आहे खडतर प्रवास, रंजक वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.