गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भुवनेश्वरीने दिलेले चॅलेंज अधिपती-अक्षरा पूर्ण करणार का?, एन्जॉय करत दोघांचाही सुरु आहे खडतर प्रवास, रंजक वळण

Saurabh Moreby Saurabh More
जून 24, 2024 | 3:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update Akshara and Adhipati facing a new challenge.

भुवनेश्वरीने दिलेले चॅलेंज अधिपती-अक्षरा पूर्ण करणार का?, एन्जॉय करत दोघांचाही सुरु आहे खडतर प्रवास, रंजक वळण

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेमाचे काही खास क्षण पाहायला मिळाले. नुकतीच अक्षराने अधीपतीला तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसलं. मात्र ही गोष्ट भुवनेश्वरीलं काही पटली नाही आणि तिने या दोघांना नुकतेच घराबाहेर काढले.

भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना सुर्यवंशी घराण्याच्या रितीनुसार, खऱ्या संसाराला सुरुवात व्हायच्या आधी नवरा-बायकोने अंगावरील कपड्याबरोबर दहा दिवस घराबाहेर राहायचं, सूर्यवंशी घराण्याची ओळख न सांगता सगळ्या अटी पाळून, एकमेकांची साथ न सोडता बाहेरच्या जगात नीट राहू शकले तर त्यांचा संसार सुखाचा होतो असं म्हणून घराबाहेर पडायला भाग पाडले. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या नात्यात आणखी जवळीक येत आहे. घराच्या  बाहेर अधिपती-अक्षरा अगदी सुखाने नांदत आहेत आणि त्यांच्यातील याच खास क्षणांची झलक सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे अधिपती-अक्षरा यांचे काही खास प्रोमो शेअर करण्यात आले असून यातील एक प्रोमो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”

या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा अधिपतीला “तुम्ही माझ्याबरोबर असताना मला कसली भीती वाटणार” असं म्हणत अधिपतीला तुम्हाला भीती वाटत आहे का?” असं विचारते. यापुढे अधिपती “तुम्ही माझ्याबरोबर असताना मला भीती वाटत नाही मग मला तुमच्याबरोबर असताना भीती का वाटेल” असं म्हणतो. यापुढे तो “तुमच्याबरोबर कुठेही यायला तयार आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, जंगलात, समुद्रात, वाळवंटात, आकाशात किंवा हिमालयात कुठेही यायला मी तयार आहे” असं म्हणतो.

आणखी वाचा – “आता इंग्रजी गाणी का गाते?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर केतकी माटेगावकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मराठी गाणी…”

पुढे अधिपती “अरे संसार… संसार…” असं म्हणत अक्षराचा हात हातात घेत “चला की मंडळी” असं म्हणतो. पुढे अक्षराही अधिपतीच्या हातात हात देत “चला की धनी” असं म्हणते. दरम्यान, अधिपती त्यांच्यातील ही केमिस्ट्री सध्या चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात  केली असून त्यांचा हा नवीन प्रवास चाहत्यांनाही भलताच आवडत आहे.       

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Sumeet Pusavale wife

'घरोघरी मातीच्या…'मधील हृषीकेशची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते इतकी सुंदर, रोमँटिक पोस्टने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.