‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका साऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकात आलेल्या ट्विस्टननंतर ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच मालिकेत एजे व लीला यांचे मनाविरुद्ध लग्न झालं आहे आणि मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी एका वेगळ्याच वळणावर आली आहे. मालिकेत लीलाच्या भूमिकेत असणाऱ्या वल्लरीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. (Vallari Londhe Birthday Celebration)
या मालिकेत लीलाचा अल्लडपणा, मस्तीखोरपणा, स्पष्टवक्तेपणा विशेष भावत आहे. वल्लरी लोंढे ही अभिनयाबरोबर सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते आणि ती अनेकदा त्यांचे पडद्यामागील काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते. शिवाय सेटवरील धमाल, मस्तीचे अनेक व्हिडीओही ती वेळोवेळी शेअर करताना दिसते. अशातच वल्लरीच्या एका खास पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. वल्लरीने तिच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे.
वल्लरीचा वाढदिवस हा नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. या तिच्या आयुष्यातील खास दिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये वल्लरीच्या सहकलाकारांनी व मालिकेच्या टीमने मिळून तिचा वाढदिवस सीन दरम्यान साजरा केलेला दिसत आहे. यावेळी वल्लरी खूप खुश असल्याचं दिसत आहे. आपल्या कामावर वाढदिवस साजरा झाल्याने ती खूप खुश दिसत होती.
वल्लरीने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज माझा कामावरच वाढदिवस साजरा करण्यात आला. कामावरचा वाढदिवस साजरा झाला आणि मला ते खूप आवडलं. केक माझ्या आवडत्या रंगाचा होता. मी स्वतः केक खात आहे. माझे काही सहकारी आणि दिग्दर्शक गायब आहेत. माझ्या वाढदिवसानिमित्त शर्मिला ताई माझ्यापेक्षा जास्त उत्साहित आहेत. माझ्या आई मावशीने मला सेटवर सरप्राइज देत अधिक आश्चर्यचकित केले”. वल्लरीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.