बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझी उंची व दर्जाही कमी आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला सेलिब्रिटी कीडने हिणवलं, म्हणाली, “खूप रडले आता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 3, 2024 | 5:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Urmila nimbalkar post

"तुझी उंची व दर्जाही कमी आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला सेलिब्रिटी कीडने हिणवलं, म्हणाली, "खूप रडले आता…"

अभिनयाचा कोणताही वारसा नसताना स्वमेहनतीने स्वतःचं वेगळं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करणारे बरेच कलाकार आहेत. यामध्ये एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. हिंदी व मराठी मालिकांमधून अभिनयाची छाप सोडत आजवर छोटा पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने स्वतःच नाव स्वमेहनतीने कमावलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Urmila nimbalkar post)

अभिनेत्रीने नुकत्याच नेपोटीझमबाबत केलेलं भाष्य लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “कोण म्हणतं बॅालीवूडमध्येच नेपोटीझम असतं? आज एक वर्तुळ पूर्ण झालं. फर्ग्युसनमध्ये दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत असताना पुरूषोत्तम एकांकीका स्पर्धेसाठी कॅालेजच्या टीममध्ये जायचं होतं. स्वप्नच होतं ते. त्याआधी झालेल्या वर्कशॉपमध्ये पण रितसर निवड वगैरे झाली. मी खूप खुश झाले पण दुस-या दिवशी जेव्हा कॅालेजमध्ये गेले तेव्हा वेगळ्याच गोष्टी घडल्या होत्या. कोण म्हणतं नेपोटीझम फक्त बॅालीवूडमध्ये होतं”.

आणखी वाचा – “वाईट पब्लिसिटी आणि…”, पूनम पांडेवर भडकले नेटकरी, कमेंट करत राग व्यक्त केला अन्…; म्हणाले, “हिला अटक करा कारण…”

यापुढे ती म्हणाली आहे, “कॅालेजमध्ये काही सेलिब्रिटींची मुलं होती आणि त्यांचा कलामंडळात खूप दबदबा होता. त्यांनी स्वतःच्या आईबापांच्या मदतीने दबाव आणून संपूर्ण संघ बदलला आणि गावातून आलेली एक पोरगी बाहेरची. थेट ऑनस्टेज करेल हे कसं होईल आणि मला संघातूनच काढण्यात आलं. मी खूप भांडले पण काहीच झालं नाही, मला बॅकस्टॅजला तरी घ्या म्हणत होते पण त्यांना मी नको होते म्हणून त्यांनी मला काढलं. काहीच होत नाही म्हणून मी बाहेर आले तेव्हा त्यातल्या एका सेलिब्रेटी कीडने मला ‘उर्मिला तुझी उंचीही कमी आहे आणि तुझा दर्जाही कमी आहे, तुला संघात घूसूपण देणार नाही’ असं म्हणून हिणवले, तेव्हा मी याच मेन बिल्डींगच्या बाहेर येऊन खूप रडले ते आज फर्ग्युसनच्या तितक्याच फेमस मुक्तछंद या कार्यक्रमात मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं”.

आणखी वाचा – “तू पागल आहेस का?”, राखी सावंतने पूनम पांडेसाठी शूट केला व्हिडीओ, जिवंत असल्याचं कळताच म्हणाली, “खूप रडले पण तुला…”

हा किस्सा पुढे सांगत ती म्हणाली, “ज्या मेन बिल्डींगच्या बाहेर मी रडले त्याच्याच बाहेर आज विद्यार्थ्यांचा सेल्फी घेण्यासाठी मोठ्ठा गराडा होता, असंख्य मुली मला भेटून तुझ्या कन्टेटमुळे आम्हाला दिशा मिळाली आणि आमच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल होत आहे असं भरभरुन सांगत होत्या. तिथल्या शिक्षक मंडळींच्या डोळ्यात खूप प्रेम होतं आणि त्यातला एका शिक्षकांच्या मी पाया पडले तेव्हा मला रडतानाची तू अजून आठवते आहेस खूप मोठ्ठी झालीस पोरी, अजून पुढे जायचंय, असं म्हणून पाठ थोपटली. खरं तुमच्याशी सगळं शेअर करण्याचा हेतू माझ्यावर किती अन्याय झाला आहे, मी किती भारी आहे असं सांगण्याचा मूळीच नाही. मला माहिती आहे अगदी शालेय वयापासून नोकरीपर्यंत कित्येक मुला-मुलींना पात्रता असून सुध्दा डावलण्यात येतं. नवीन काहीतरी उत्साहाने प्रामाणिकपणाने करण्याची इच्छा असणारे बाहेरची मुलं प्रस्थापितांना नकोच असतात, त्यामुळे हे होणारच”.

आणखी वाचा – “लहान मुलांना पळवून…”, सुकन्या मोनेंनी सोलापूर यात्रेमधील सत्य दाखवलेल्या व्हिडीओची प्रशासनाने घेतली दखल, म्हणाल्या, “गैर गोष्टी…”

पुढे उर्मिला म्हणाली, “मला एवढंच सांगायचंय की म्हणून आपण धडका मारायचं थांबायचं नसतं. फक्त एक संधी गेली, दोन गेल्या, तीन गेल्या, चार गेल्या तरीही स्वतःला कसलीही सहानभूती न देता, कोणतंही कारण न देता आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे, उलट असे सेटबॅक्सच आपल्यात अजून जास्त आग लावतात आणि त्वेषाने काम करण्याचं बळ देतात म्हणून चला धडका मारत राहूयात”.

Tags: entertainmentmarathi actressurmila nimbalkarurmila nimbalkar instagramurmila nimbalkar nepotismUrmila Nimbalkar Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

असं आहे मुग्धा वैशंपायनच्या सासरकडचं घर, नवऱ्यासह कोकणात रमली गायिका, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.