सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू पागल आहेस का?”, राखी सावंतने पूनम पांडेसाठी शूट केला व्हिडीओ, जिवंत असल्याचं कळताच म्हणाली, “खूप रडले पण तुला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 3, 2024 | 4:26 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Popular model and actress Poonam Pandey died at 32 News in Marathi

पूनम पांडे मृत्यू बातमी

Poonam Pandey Died at 32 : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिच्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला होता. यानंतर आता अचानक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याचा खुलासा करत अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओने साऱ्यांना संभ्रमात पाडलं आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे निधन झालं असल्याची माहिती सांगण्यात आली. पूनमच्या निधनाची बातमी ऐकताच सगळ्यांनाच दुःख झालं होतं. यानंतर पूनम जिवंत असल्याचं समोर आलं असून तिने स्वतः इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती करण्याच्या हेतून हा स्टंट केला असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं.

त्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं असल्याचं समोर आलं. आता पूनमच्या या कृतीमुळे लोक चांगलेच संतापले आहेत. दरम्यान अभिनेत्रीला जोरदार ट्रोलही करण्यात येत आहे. काही कलाकारांनी व्हिडीओ करत अभिनेत्रीला खडेबोल सुनावले आहेत. यानंतर आता अभिनेत्री राखी सावंत हिने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कालही पूनमच्या निधनाच्या बातमीने अभिनेत्री राखी सावंत हिने एक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. त्यांनतर अभिनेत्री राखीने पूनमच्या जिवंत असल्याच्या व्हिडीओनंतर संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “लहान मुलांना पळवून…”, सुकन्या मोनेंनी सोलापूर यात्रेमधील सत्य दाखवलेल्या व्हिडीओची प्रशासनाने घेतली दखल, म्हणाल्या, “गैर गोष्टी…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओमध्ये राखीने असं म्हटलं आहे की, “पूनम तू आमचा जीव घेतलास. पूनम पांडे तू वेडी आहेस का? असा मृत्यूचा व्हिडीओ शेअर करत कोण पब्लिसिटी स्टंट करतं. मीडिया, चाहते आणि माझ्या भावनांशी तू खेळली आहेस. काय खेळ चालवला आहेस. असं कृत्य कोण करतं. मी कालपासून दुखी आहे. माझा व्हिडीओ काल रिलीज होणार होता पण मी स्पष्ट नकार दिला. म्हटलं, माझ्या मैत्रिणीने या जगाचा निरोप घेतला आहे तर मला आजच्या या दिवशी कोणतंच काम करायचं नाही. मी खूप रडले. कोण असं वागत? आम्ही तुझ्या या वागण्याने खूप दुखावलो आहोत”.

आणखी वाचा – “वाईट पब्लिसिटी आणि…”, पूनम पांडेवर भडकले नेटकरी, कमेंट करत राग व्यक्त केला अन्…; म्हणाले, “हिला अटक करा कारण…”

यापुढे ती म्हणाली आहे की, “कालपासून मी तुला किती कॉल्स करत आहे, ऑडिओ नोट्स पाठविले पण तुझा काहीच रिप्लाय आला नाही. तू जिवंत रहा, खुश रहा. कधीच असं कृत्य करु नकोस. ज्याने मीडिया, तुझे चाहते दुखावले जातील. ३२ व्या वर्षी तू या जगाचा निरोप घेतला हे ऐकून सर्वच दुःखी झाले होते, पुन्हा असं वागू नकोस”.

Tags: poonam pandeyPoonam Pandey Death News in MarathiPoonam Pandey Death Reasonrakhi sawantrakhi sawant angryWho Is Poonam Pandey
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Urmila nimbalkar post

"तुझी उंची व दर्जाही कमी आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला सेलिब्रिटी कीडने हिणवलं, म्हणाली, "खूप रडले आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.