बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या खूप चर्चेत आला आहे. गोविंदा यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता यादेखील अनेकदा त्यांच्याबद्दल भाष्य करताना दिसतात. अशातच आता गोविंदाची मुलगी टीना अहुजा ने असं काही वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ती आता चर्चेत आली आहे. नुकतीच टीना आई सुनीताबरोबर एका मुलाखतीमध्ये आईबरोबर पोहोचली होती. यावेळी तिने एक असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे सोशल मीडियावर आता एकच सुरु आहे. तिने मुलींच्या मासिक पाळीविषयी भाष्य केले आहे. त्यामुळे ही चर्चा अधिक रंगली आहे. टीना नक्की काय म्हणाली? हे आपण आता जाणून घेऊया. (govinda ahuja daughter statement on periods cramp)
गोविंदाची मुलगी टीनाने अभिनय न निवडता व्यवसाय करायचे ठरवले. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी तिने मासिक पाळी व त्यावेळी होणाऱ्या दुखण्यांवरदेखील भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मी चंदीगडमध्ये जास्त राहिले. मी फक्त मुंबई व दिल्लीमधील मुलींना मासिक पाळीच्या दुखण्याचा त्रास होत असलेला ऐकायला आहे. ही समस्या केवळ जे याबद्दल चर्चा करतात त्यांना असल्याचे समजते आणि काही जणींना दुखत नाही पण मानसिकरित्या तसं वाटतं. पंजाब व इतर लहान शहरांमध्ये महिलांना पाळी आलेलंही समजत नाही. त्यांना या गोष्टीची जाणीव होत नाही”.
तसेच पुढे ती म्हणाली, “माझं शरीर एकदम देशी आहे. मला पोटाचं आणि पाठीचं दुखणं कधीही जाणवत नाही. पण मी इथे अनेक मुलींना मासिक पाळीच्या दुखण्याविषयी बोलताना ऐकते. तूप खा, खाण्याच्या सवयी चांगल्या ठेवा. उगाचच डाएट करणं सोडा, योग्य झोप घ्या. यामुळे सगळं सामान्य होईल. अनेक मुलींना डाएटचे अधिक वेड आहे”. यावेळी तिथे असलेल्या सुनीता यांनी या सगळ्याला सहमती दर्शवली आहे.
आणखी वाचा – प्रियांका चोप्राचं दमदार कमबॅक, राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार, लवकरच चित्रिकरणास सुरुवात
सुनीता यांनी सांगितले की, “तुम्ही जे काही खाल, प्याल त्याआधी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. गोविंदाच्या बायकोने एक चमचा तूप खायला सांगितले म्हणून हृदयात ब्लॉकेज आले असं म्हणून मला दोष देऊ नका”. दरम्यान गोविंदाच्या मुलीच्या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.