Titeeksha Tawade and Siddharth Bodke : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके. तितीक्षा व सिद्धार्थ यांनी वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधली. अनेक वर्षांपासून असलेल्या त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावरही तितीक्षा व सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते एकमेकांबरोबरचे खास फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सिद्धार्थ-तितीक्षा या जोडीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. लग्नानंतरचा त्यांचा खास बॉण्ड आपण नेहमीच तितीक्षाच्या व्हिडीओमधून पाहतो. शिवाय तिच्या सासरच्यांबरोबरचा बॉण्डही आपण पाहिला आहे. पण खरंच तितीक्षाचे तिच्या सासरच्या मंडळींसह बॉण्ड कसे आहे, आणि सिद्धार्थला तितीक्षा कशी वाटते याबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
तितीक्षा व सिद्धार्थ यांनी नुकतीच इट्स मज्जाला गुढीपाडवा स्पेशल मुलाखत दिली. यावेळी दोघांनी बऱ्याच गप्पा मारल्या. यावेळी बोलताना सिद्धार्थने तितीक्षामधील प्रेरित करणाऱ्या गोष्टींबाबत भाष्य केलं आहे, “प्रेरित करणाऱ्या अशा अनेक गोष्टी तितीक्षामध्ये आहेत. तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करते काहीच ती अर्धवट सोडत नाही. मला तितीक्षाच काम खूप आवडतं. तितीक्षाची अभिनेत्री म्हणून स्पेशल गोष्ट म्हणजे कितीही क्लिष्ट डायलॉग आले तरी ती स्पष्ट करते. त्यात काहीच बदल न करता ती ते वाक्य अगदी चोखपणे अचूक बोलते हे ती सहज करते. माणूस म्हणून ती उत्तम आहे. गोड आहे. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे ती कुटुंबाला धरुन ठेवणारी आहे. तिला तिची माणसं कायम तिच्याबरोबर हवी असतात. कुटुंबाला ती नेहमीच प्रथम प्राधान्य देते”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मध्ये आठ वर्षांनी येणार दयाबेन, शूटिंगही केलं सुरु, दिशा वकानी ‘या’ भूमिकेत पुन्हा दिसणार का?
तर तितीक्षा तिच्या सासरच्या मंडळींबाबतच्या बॉण्डबद्दल बोलताना म्हणाली, “माझे सासू-सासरे खूप गोड आहेत. मी खूप नशीबवान आहे. मी सिद्धूला नेहमी म्हणायचे की, मला तुझ्यासाठी कमी पण तुझ्या कुटुंबासाठी तुझ्याशी लग्न करावं वाटतं. ते कुटुंब खरंच खूप गोड आहे. ते माझ्यावर किती प्रेम करतात हे नेहमीच मला भरभरुन सांगतात आणि त्यांच्या कृतीतूनही ते दिसून येतं. आई तर माझी मैत्रीण आहे. त्या कुठल्याही पिढीमध्ये मोडू शकतात. आणि त्या त्या पद्धतीने माझ्याशी वागतात. माझं वजन वाढण्याचं लग्न हे कारण आहेच पण आणखी एक कारण आहे ते म्हणजे बाबा”.
पुढे ती म्हणाली, “माझे बाबा माझ्या आवडीचं मला खूप खाऊ घालतात. नाशिकमध्ये गणेश स्वीट म्हणून एक दुकान आहेत तिथला मिल्क केक मला खूप आवडतो. तर जेव्हा केव्हा मी नाशिकला जाणार त्याच्या बरोबर आधी माझ्यासाठी एक किलोचा केक घरी आधीच आणून ठेवलेला असतो आणि तो मी पूर्ण संपवते. बाबा याला कारणीभूत आहेत. आई-बाबा माझ्यावर भरपूर प्रेम करतात”.