शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वामींची मुर्ती, अँटिक वस्तू, पारंपरिक टच अन्…; आतून असं आहे तेजस्विनी पंडितचं आलिशान घर, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 16, 2023 | 2:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tejaswini Pandit Home

स्वामींची मुर्ती, अँटिक वस्तू, पारंपरिक टच अन्…; आतून असं आहे तेजस्विनी पंडितचं आलिशान घर, फोटो समोर

गुलाबाची कळी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. या अभिनेत्रीने कायमच आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. निरनिराळ्या भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त निर्मिती क्षेत्र व विविध व्यायसायिक क्षेत्रातही तेजस्विनी कार्यरत आहे. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Tejaswini Pandit Home)

दिवाळीनिमित्त तेजस्विनीने काढलेले खास फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.यंदाची दिवाळी तेजस्विनीने दणक्यात साजरी केलेली पाहायला मिळतेय. पारंपरिक अंदाजात काढलेले फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. अशातच या फोटोंमधील आणखी एक आकर्षणाची बाब म्हणजे तेजस्विनीचं घर. तेजस्विनीनेने दिवाळीनिमित काढलेल्या फोटोंमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा नवऱ्याबरोबरचा वाद आणखीनच वाढला, नको नको ते बोलत लाथ मारली अन्…; काम्या पंजाबी म्हणते, “तिला शोमध्ये…”

दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये तेजस्विनी तिच्या कुटुंबीयांबरोबर पाहायला मिळतेय. यांत तेजस्विनी आणि तिच्या कुटुंबीयांचा पारंपरिक लूक पाहायला मिळतोय. दिवे हातात घेऊन तेजस्विनी व तिच्या बहिणीने फोटो काढले आहेत. या फोटोंमधील तेजस्विनीच्या घराने लक्ष वेधून घेतलं आहे. तेजस्विनीच्या घराचं आकर्षक असं इंटेरियर असून घराला दिलेल्या पारंपरिक टचने घराचं सौंदर्य खुलून आलं आहे. तेजस्विनीच्या या घरात सुंदर अशी स्वामींची तशीच विठूरायाची मूर्ती पाहायला मिळाली. दिवाळीनिमित्त घरात केलेल्या रोषणाईने घर लख्ख उजळून निघालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini ????️???? (@tejaswini_pandit)

आणखी वाचा – “हार्दिक शुभेच्छा नाही तर आर्थिक…”, नाटकांवरुन प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “प्रेक्षकांना नम्र विनंती की…”

तेजस्विनीचा पारंपरिक लूकही लक्षवेधी ठरत असून तिच्या घराचं इंटेरियर भाव खाऊन गेलं आहे. आई, बहीण व स्वतः तेजस्विनी यांनी एकत्र दिवाळी साजरी केली असून तेजस्विनीच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. तेजस्विनीने ‘बांबू’ या चित्रपटाची निर्मिती केली असून तो तिचा निर्मित केलेला पहिला सिनेमा आहे. तसेच ‘अथांग’ या वेबसीरिजची निर्मितीही तिने केली आहे. ‘तू ही रे’,’येरे येरे पैसा’,’अगं बाई अरेच्चा’, ‘फॉरेनची पाटलीण’ अशा अनेक सिनेमांत तेजस्विनी पंडीतची झलक पाहायला मिळाली.

Tags: marathi actresstejaswini pandittejaswini pandit hometejaswini pandit on diwali vibe
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
nana patekar slap his fan in front of camera video goes viral on social media actor and director statement see details

"डोक्यावर मारायला…", चाहत्याला फटकावल्यानंतर दिग्दर्शकाचं भाष्य, तर नाना पाटेकरांनी भलतंच दिलं स्पष्टीकरण, नक्की खरं कोणाचं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.