Mrinal Kulkarni Mother In Law : कलाविश्वात अशी अनेक कलाकार मंडळी जी त्याचं घरदार सांभाळून सिनेविश्वात कार्यरत आहेत. विशेषतः महिला कलाकारांना याची जास्त झळ लागते. शूटनिमित्त घराबाहेर असल्याने अनेकदा या अभिनेत्रींना घरापासून दूर राहावं लागतं. बरेचदा या अभिनेत्रींच्या घरच्या मंडळींचा बराच पाठिंबा असलेला पाहायला मिळतो. या सगळ्याचा अनुभव सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देखील अनुभवला. या सगळ्यात मृणाल यांच्या पाठीशी त्यांच्या सासूबाई खंबीरपणे उभ्या होत्या. मृणाल यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून याबाबत खुलासा केला आहे. सासूबाईंच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त मृणाल यांनी पोस्ट शेअर करत सासूबाईंच्या पाठिंब्याबाबत भाष्य केलं आहे.
अष्टपैलू आणि एव्हर ग्रीन अभिनेत्री म्हणून मृणाल कुलकर्णी यांच्याकडे पाहिलं जात. अभिनय, लेखन, दिग्दर्शन प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात मराठी दूरदर्शनवरील ‘स्वामी’ या मालिकेतून केली. त्यानंतर त्यांनी ‘श्रीकांत’, ‘द ग्रेट मराठा’, ‘मीराबाई’ यांसारख्या अनेक मालिका केल्या. ‘सोनपरी’ या मालिकेतून तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच घर केलं. सोशल मीडियावर मृणाल बऱ्यापैकी सक्रिय असतात. अशातच त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – सलमान खानच्या मानलेल्या बहिणीचा मोठा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, ओळखणंही झालं कठीण

मृणाल यांनी पोस्ट शेअर करत, “९० व्या वर्षात प्रसन्न पदार्पण. माझ्या सासूबाई या माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती. ज्यांच्या जीवनावरच्या प्रेमाने, उत्साहाने मला कायमच अचंबित केलं आहे. स्वत: एक यशस्वी स्त्रीरोग तज्ञ आणि आम्हा सर्वांना कायम भक्कम पाठिंबा देणारी ही व्यक्ती. यांच्याच आग्रहामुळे मी विराजस कुलकर्णीला (मुलगा) निर्धास्तपणे त्यांच्यावर सोपवून माझी कारकीर्द घडवू शकले. आज त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत हे आमचं मोठं भाग्य. त्यांना निरोगी आणि प्रसन्न आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असं म्हणत सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – दिल्लीच्या नाइट क्लबमध्येचही सैफ अली खानवर झाला होता हल्ला, चेहऱ्याचा नाश करण्याचीच दिलेली धमकी आणि…
मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस याने आईच्या पावलावर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत करिअरची सुरुवात केली आहे. अभिनय व दिग्दर्शन अशी दुहरी बाजू तो सांभाळत आहे. तर सून शिवानी रांगोळेही मालिका व सिनेविश्वात सक्रिय आहे. सध्या शिवानीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका तुफान गाजतेय.