Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नसोहळ्याचे अचानक समोर आलेले फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. थेट लग्नसोहळा उरकल्यानंतर पियुष-सुरुचीने त्यांच्या लग्नातील खास क्षण चाहत्यांसह शेअर केले. यापूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याचा कधीच खुलासा केला नाही. दरम्यान दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या लग्नसोहळ्यातील फोटोंनी अक्षरशः धुमाकूळ घातला.
सुरुची व पियुष यांचे लग्नसोहळ्यातील फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या हळदी व मेहंदी समारंभातील फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दोघांच्या लग्नातील रिसेप्शनच्या लुकलाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सुरुची-पियुष यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत “आनंदाचा दिवस” असं म्हणत लग्नाचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले होते. दरम्यान दोघांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.
सुरुची व पियुष यांचा विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने पार पडला. विधिवत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात सुरुचीने पियुषसाठी नेमका कोणता उखाणा घेतला याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने पियुषसाठी घेतलेल्या खास उखाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘इट्स मज्जा’ला सुरुची व पियुषने नुकतीच मुलाखत दिली. केळवण स्पेशल अशा या मुलाखतीत दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.
आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ
दोघांनी या मुलाखतीदरम्यान त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल तसेच त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने संवाद साधला. पियुष व सुरुची यांनी त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी सुरुचीने पियुषसाठी खास उखाणा घेतला. “नवीन आयुष्याची सुरुवात झाली लावते दारावरती तोरण, पियुषचं नाव घ्यायला कशाला हवं आहे कारण” असा उखाणा तिने घेतला. सुरुची-पियुष यांच्या लग्नानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली असून दोघे एकमेकांबरोबर आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.