Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : गेले काही दिवस हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई पहायला मिळत आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लगीनगाठ बांधली. प्रसाद-अमृता ही जोडी एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकली. नुकतेच मुग्धा वैशंपायन हिच्या मोठ्या बहिणीचंही अगदी साधेपणाने लग्न पार पडले. अशातच पियुष रानडे व सुरुची अडारकर या जोडीनेदेखील एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. पियुष-सुरुची यांच्या मेहंदी व हळदी समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या लूकमधील फोटोंनासुद्धा चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांसह अनेकांचे लक्ष वेधून घेतलं.
पियुष-सुरुची यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “आनंदाचा दिवस” म्हणत लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे कलाकारांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनाही आनंदाचा धक्का बसला होता. सुरुची-पियुष यांनी त्यांच्या नात्या बद्दल याआधी कुठेहीची कबुली दिली नाही. अशातच अचानकपणे त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने या जोडीविषयी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. सुरुची-पियुष यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली?, त्यांच्या नात्यात नेमका कुणी पुढाकार घेतला? याबद्दल दोघांनीही भाष्य केले आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’च्या केळवण स्पेशल कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.
आणखी वाचा – Video : सुकन्या मोनेंनी हातावर काढला टॅटू, नेमका अर्थ काय?, लेकीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
यावेळी सुरुची म्हणाली, “आम्ही एकमेकांना डेट केलं नाही. आमच्या आयुष्यामध्ये तो काळच आला नाही. एक दिवस अचानक पियुष म्हणाला की, चल आपण लग्नाबाबत घरी सांगूया. त्यादरम्यान मी त्याला विचारलं की, तू हे खरंच बोलत आहेस का?. तर त्याने मला होय असं उत्तर दिलं. कारण लग्न म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी असते. लग्नाबाबत सांगितल्यावर कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया येतील हाही विचार महत्त्वाचा होता. आम्ही पहिल्यांदा आमच्या पालकांनाच सांगितलं. आमच्या घरी आमच्या नात्याबाबत माहित होतं.”
आणखी वाचा – येत्या नवीन वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी, ‘मिर्झापूर’, ‘पंचायत’सारख्या बहूचर्चित सिरीजचे नवीन सीझन येणार
यापुढे पियुष असं म्हणाला की, “आमच्यामध्ये मैत्री खूप घट्ट आहे. ‘अंजली’ मालिकेनंतर आमचा जो ग्रुप झाला ते सगळेच आम्ही एकमेकांशी खूप जोडले गेलेलो आहोत. जवळपास पाच वर्षांपासून आमची मैत्री होती. आताही आम्ही घरी असतो तेव्हा नवरा-बायकोसारखं वागत नाही. नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे.” दरम्यान, सुरुची-पियुष यांच्या लग्नाला आधीपासूनच घरच्यांचा पाठिंबा होता आणि आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली असून दोघे एकमेकांबरोबर आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.