शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मध्यंतरीच्या त्या काळात तिने मला…”, अशी सुरु झाली होती सुरुची अडारकर व पियुष रानडेची Love Story, म्हणाला, “प्रेम वगैरे नंतर पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 20, 2023 | 12:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suruchi Adarkar And Piyush Ranade Lovestory

"मध्यंतरीच्या त्या काळात तिने मला...", अशी सुरु झाली होती सुरुची अडारकर व पियुष रानडेची Love Story, म्हणाला, "प्रेम वगैरे नंतर पण..."

सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत असताना मराठमोळ्या कलाकारांनी लगीनगाठ बांधल्याचे फोटो अचानक समोर आले. ही कलाकार मंडळी म्हणजे अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकर. सुरुची व पियुषने विवाहसोहळा उरकला असल्याचे अचानक समोर आले. सोशल मीडियावरून थेट लग्नाचे फोटो शेअर करत या कलाकारांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. (Suruchi Adarkar And Piyush Ranade Lovestory)

याआधी कधीच या जोडप्याने त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. त्यात अचानक समोर आलेल्या या जोडीच्या लग्नाच्या फोटोंमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. सुरुची व पियुष यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली. याबाबत नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी भाष्य केलं आहे. इट्स मज्जाने सुरुची व पियुष यांचं केळवण स्पेशल अशी मुलाखत घेतली. यावेळी बोलताना दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल तसेच त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ मधील जेठालालच्या लेकाच्या लग्नाची चर्चा, सूनही आहे कलाकार, पाहा खास फोटो

सुरुची व पियुष यांनी त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल भाष्य केलं. सुरुची म्हणाली, “मैत्रीपासूनच आमच्या नात्याला सुरुवात झाली. अंजली मालिका करत असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो. एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांना ओळखत असतो. पण आम्ही एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो. अंजली मालिकेदरम्यान आमची खूप छान मैत्री झाली. मालिकेतील सात जणांचा आमचा अजूनही ग्रुप आहे. आमची सगळ्यांचीच मैत्री खूप छान होती. मालिका बंद झाल्यानंतर जवळपास वर्षभर आमचा एकमेकांशी काहीच संबंध नव्हता. कारण प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यग्र होते. जवळपास एक ते दिड वर्षांनंतर पुन्हा एकदा आम्ही संपर्कात आलो. पण हे सगळं कधी जमून आलं हे आम्हालाच कळलं नाही. आम्ही एकमेकांजवळ व्यक्तही झालो नाही. दीड ते दोन वर्षांनंतर आम्हा दोघांनाही एकमेकांबाबत प्रेम वाटू लागलं”.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

आणखी वाचा – Video : सुकन्या मोनेंनी हातावर काढला टॅटू, नेमका अर्थ काय?, लेकीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

पुढे पियुष म्हणाला, “आम्ही अजूनही एकमेकांना प्रपोज केलं नाही. पण आम्ही दोघं एकत्र असणंच दोघांनाही आवडू लागलं. सुरुचीचा मला पाठिंबा मिळत आला आहे. मध्यंतरी माझ्या पडत्या काळामध्ये तिने मला जो पाठिंबा दिला तो कमालीचा होता. पाठिंब्याची व्याख्या म्हणजे सुरुची आहे. कितीही त्रास झाला, कोणताही प्रसंग आला तर त्याला कसं समोरं जायचं? कसं सांभाळायचं? हे तिला योग्य माहित आहे. हा तिचा गुण मला खूप आवडला. फक्त माझ्याबरोबरच नाही सगळ्यांबरोबरच तिचं नातं चांगलं आहे. प्रेम वगैरे सगळं नंतर आलं पण तिच्यामध्ये असणारी माणूसकी मला अधिक भावली. आय लव्ह यु म्हणण्यापेक्षा मी तिचा आभार मानतो. तिने मला खूप अडचणींमधून बाहेर काढलं आहे. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. पण त्यासाठी मी तिचेच आभार मानतो. सुरुची माझ्या आयुष्यात आली आणि मी खूप पुढे गेलो”.

आणखी वाचा – ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव व ऋषी सक्सेनाची जोडी सात वर्षांनी पुन्हा एकत्र, अभिनेत्री एकत्र फोटो शेअर करत म्हणाली…

सुरुची व पियुष यांचा सुखाचा संसार सुरु झालेला पाहायला मिळत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याची नवी सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi couplePiyush RanadeSuruchi AdarkarSuruchi Adarkar And Piyush Ranade Lovestory
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
Next Post
Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding

श्रेया बुगडेने भावाच्या लग्नाची केली होती जय्यत तयारी, पियुष रानडेने लाडक्या बहिणीचं केलं कौतुक, म्हणाले, "सगळं गुपित ठेवायचं होतं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.