शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकारही हादरले, देवाकडे प्रार्थना, सुकन्या मोने म्हणाल्या, “स्वामी समर्थ…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 15, 2023 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress sukanya mone and resham tipnis expressed concern about shreyas talpade's health

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकारही हादरले, देवाकडे प्रार्थना, सुकन्या मोने म्हणाल्या, “स्वामी समर्थ...”

बॉलिवूडसह मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. नुकतीच त्याच्या तब्येतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. ते संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. शूटिंगनंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Shreyas Talpade Health Update)

रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल्यामुळे मोठा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयसची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पण तरीही विश्रांतीसाठी आणखी काही दिवस त्याला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. त्याच्या तब्येतीची बातमी कळताच अनेक चाहत्यांनी काळजी व्यक्त केली.

View this post on Instagram

A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?

अशातच अभिनेत्याची पत्नी दीप्ती तळपदेने यासंबंधीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर तुम्ही दाखवलेली काळजी, प्रेम व प्रार्थनेसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मला हे सांगताना अतिशय समाधान वाटतं आहे की, श्रेयसची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे. यादरम्यान डॉक्टरांनी वेळेवर तातडीने केलेल्या मदतीसाठी व त्यांनी दाखवलेल्या कौशल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हा दोघांना संकटाशी सामना करायचं बळ मिळत आहे.”

आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी नेमकं काय घडलं?, घरी येऊन लगेचच पत्नीला सांगितली ती गोष्ट अन्…

दरम्यान, तिने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे श्रेयसच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनीही यावर कमेंट केली आहे. अभिनेत्री रेशम टिपणीसने “काळजी घे. श्रेयसला लवकरच बरं वाटेल. गणपती बाप्पा त्याची काळजी घेत आहे” असं म्हटलं आहे तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही “श्री स्वामी समर्थ” अशी कमेंट केली आहे. तसेच श्रेयसच्या अनेक चाहत्यांनीही कमेंटद्वारे त्याच्या तब्येतीबाबत प्रार्थना व्यक्त केली आहे.  

Tags: entertainmentmarathi entertainmentMarathi newsshreyas talpadeshreyas talpade health updateshreyas talpade newssukanya mone
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sugandha Mishra Shared Goodnews

'कपिल शर्मा शो' फेम सुप्रसिद्ध कॉमेडियन सुगंधा मिश्रा झाली आई, रुग्णालयामधील व्हिडीओ समोर, नवऱ्याने दाखवली लेकीची झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.