सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, नवऱ्यावर मारहाणीचा आरोप अन्…; आता मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, लूक बदलला आणि…

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 19, 2023 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sneha Chavan look after Aniket Vishwasrao divorce

लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, नवऱ्यावर मारहाणीचा आरोप अन्…; आता मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणंही झालंय कठीण, लूक बदलला आणि…

मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री त्यांच्या कामामुळे जितके चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. या अभिनेत्रींना अभिनय क्षेत्रात मोठं यश मिळालं. मात्र, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाईट अनुभव आला आहे. मात्र, त्या अभिनेत्रींनी या घटनेतून सावरत नवं आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेमध्ये आली आहे, ती म्हणजे अभिनेत्री स्नेहा चव्हाण. (Sneha Chavan look after Aniket Vishwasrao divorce)

स्नेहाने ‘लाल इश्क’, ‘सिनिअर सिटीझन’, ‘७०२ दीक्षित’ अशा अनेक मराठी चित्रपटात काम केले होते. त्याचबरोबर, अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलेलं आहे. एका चित्रपटादरम्यान स्नेहाची ओळख अनिकेत विश्वासरावबरोबर झाली होती. पुढे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. मात्र, अवघ्या दोनच वर्षात या दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा – प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, ओंकार भोजनेच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Sneha ???? (@mesnehachavan)

स्नेहा चव्हाण सध्या पुण्यात तिच्या आईकडे राहते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच तिने तिचे केस बारीक करत आपला संपूर्ण लूकमध्ये बदल केला. ती या लूकमध्ये एकदम वेगळी दिसत असून तिला आता ओळखणे कठीण झाले आहे. सध्या ती मनोरंजन क्षेत्रात दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर अनेक फोटोज व व्हिडिओज शेअर करत ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.

हे देखील वाचा – Video : ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ काही संपेना, आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमात चित्रपटातील गाण्यावर थिरकल्या हजारो महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Ashish Chavan (@ashishchavan007)

२०२१ मध्ये स्नेहाने पूर्वाश्रमीचा पती अनिकेत विश्वासरावविरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर स्नेहाने केवळ पोटगी मिळवण्यासाठी हा बनाव रचल्याचं अनिकेतने एका मुलाखतीत सांगितलं होतं. या घटनेनंतर दोन वर्षांनी म्हणजे जून २०२३ मध्ये कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला. दरम्यान, या कठीण प्रसंगात स्नेहाला तिच्या कुटुंबीयांनी मोठी साथ दिली असून आई, वडील आणि भाऊ हेच आपले आधारस्तंभ असल्याचे ती म्हणाली. ती सध्या तिच्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसते. या घटनेनंतर आता ती आपलं आयुष्य नव्याने जगत आहे.

Tags: aniket vishwasraomarathi actresssneha chavanSneha Chavan look after Aniket Vishwasrao divorce
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Nagarjuna Sister Passes Away

साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर, मोठी बहीण नागा सरोजा यांचं निधन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.