shubhangi sadavarte second marriage : सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. मराठी सिनेविश्वातही लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सोहम बांदेकर, पूजा बिरारी, सूरज चव्हाण, निमिष कुलकर्णी, कोमल कुंभार ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे शुभांगी सदावर्ते. शुभांगी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. अखेर तिने घटस्फोटाच्या तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्यातील एक फोटो समोर आला आहे.
‘संगीत देवबाभळी’ फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. तीन महिन्यांपूर्वी शुभांगीने घटस्फोटाची घोषणा केली त्यावेळी साऱ्यांना धक्का बसला. मात्र, केळवणाचा व्हिडीओ शेअर करत तिने पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी दिली. अखेर शुभांगी सुमित म्हशेळकरसह विवाहबंधनात अडकली आहे. आणि दोघांनी अत्यंत साधेपणाने हा विवाह केला आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले.
आणखी वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता झाला बाबा; लेकीचं नावही ठेवलं खास, म्हणाला…

शुभांगीने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी रिपोस्ट केली आहे. ज्यात ती व सुमित खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. आणि दोघांचाही साधेपणा लक्ष वेधून घेत आहे. लग्नसाठी शुभांगीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावेळी तिने कोणतेच भरजरी दागिने, भरजरी साडी, लेहंगा या सगळ्याला पसंती न दर्शिविता साधेपणाची निवड केली आहे.
आणखी वाचा – लाल भरजरी लेहेंगा, गोल्डन ज्वेलरी आणि…; लग्नात रिसेप्शन दरम्यान पतीसह तेजस्विनीची ग्रँड एंट्री, फोटो समोर
शुभांगी सदावर्ते हिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. शुभांगी आनंद यांनी २०२० मध्ये करोना काळात लग्नगाठ बांधली होती. पण पाच वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन घटस्फोटाची घोषणा केली होती.





