‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. शिवची गौरी म्हणून सायलीला या मालिकेमुळेच खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेपासून सायलीने तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु केला. सध्या सायली एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे लवकरच प्रदर्शित होणारा ‘झिम्मा २’ हा चित्रपट होय. ‘झिम्मा’ या चित्रपटातील ही सायलीच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं, आता या चित्रपटानंतर तिच्या आगामी ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Sayali Sanjeev Tatoo)
नुकताच ‘झिम्मा २’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. या कार्यक्रमावेळी चित्रपटातील सर्वच कलाकार मंडळींनी हजेरी लावत या सोहळ्याची शोभा वाढविली होती. चित्रपटातील कलाकार मंडळींच्या पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या ट्रेलर लाँचवेळी सायली संजीव हिच्या पारंपरिक वनपीसने विशेष लक्ष वेधून घेतलं. इतकंच नव्हे तर आणखी एका गोष्टीमुळे सायली चर्चेत आली.
भगव्या, सोनेरी पट्टे असणाऱ्या या सायलीच्या वनपीसने लक्ष वेधून घेतलंच, शिवाय तिच्या अंगावरील टॅटूने साऱ्यांचं अधिक लक्ष वेधून घेतलं. सायलीने तिच्या शरीरावर काढलेल्या एका पक्ष्याच्या टॅटूची या सोहळ्यात विशेष चर्चा रंगली. हा टॅटू सायलीने तिच्या बाबांच्या आठवणीत गोंदवून घेतला होता. याबाबत तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वतः पोस्ट करत ‘बाबा तुझ्यासाठी’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केला होता. या तिच्या पारंपरिक लूकला तिने मॉडर्न टच दिला होता, याचं बरच कौतुक ही झालं. सायली नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. सायलीच्या या लुकला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली असून तिच्या या लूकवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. या लूकमध्ये सायली खूपच साधी व सोज्वळ दिसत होती.
‘झिम्मा २’ या चित्रपटात सायली महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टिझर व गाण्यानंतर ट्रेलरही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या सोहळ्यादरम्यान चित्रपटाची कलाकारांनी चित्रपटही ‘मराठी पोरी…’ या गाण्यावरही ठेका धरलेला पाहायला मिळाला. चित्रपटातील गाणं पाहिल्यानंतर ‘झिम्मा २’ बद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मात्र चित्रपटाच्या ट्रेलरने ही उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज होत आहे.