शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दीपज्योती’ मालिकेत पूर्वा कौशिकचा नवा अवतार, ‘ज्योती’च्या साध्या, सोज्वळ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 6, 2026 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Purva Kaushik New Serial

‘दीपज्योती’ मालिकेत पूर्वा कौशिकचा नवा अवतार, ‘ज्योती’च्या साध्या, सोज्वळ भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Purva Kaushik New Serial : ‘झी मराठी’वर १३ एप्रिल पासून सुरु होणारी नवी मालिका ‘दीपज्योती’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णतः वेगळी असलेली ‘ज्योती’ ही व्यक्तिरेखा साकारताना तिचा अनुभव, तयारी आणि भावना तिने व्यक्त केल्या. “झी मराठीवर परत एकदा ‘दीपज्योती’सोबत येते आहे आणि माझ्या भूमिकेचं नाव आहे ‘ज्योती’ . माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. ज्योती ही खूप समजूतदार, गुणी, घरगुती आणि साधी, गोड अशी मुलगी आहे. तिला नटण्याची-सजण्याची आवड आहे आणि ती खूप सुंदर दिसते. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे आणि ती आईसोबत राहते. वडीलही आहेत, पण त्यांच्या व्यसनामुळे तिला त्यांच्यावर खूप राग आहे. ज्योतीची ही सोज्वळ भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल”.

पूर्वा पुढे म्हणाली, “आधीही मी ‘झी मराठी’वर ‘शिवा’ नावाची भूमिका साकारली होती, जी खूप वेगळी होती आणि सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का. तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का, असा प्रश्न मनात होता. पण झी मराठीने माझा हा समज मोडून काढला. त्यामुळे ‘ज्योती’च्या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो क्षण शब्दांत सांगणं कठीण आहे. ही भूमिका माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या भूमिकेसाठी तयारी करताना माझ्या मनात सतत माझ्या आधीच्या भूमिकेशी तुलना होत राहते. खऱ्या आयुष्यात माझा स्वभाव थोडा थेट आहे. ‘शिवा’ करताना मला एवढी तयारी करावी लागली नव्हती, जितकी ‘ज्योती’साठी करावी लागत आहे”.

आणखी वाचा – दिव्यांका त्रिपाठीचा वेस्टर्न स्टाईल Baby Shower, सिनेविश्वातील कलाकारांची खास हजेरी, नवऱ्याचा जबरदस्त डान्स आणि…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

भूमिकेबाबत बोलताना ती म्हणाली, “ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. ज्योतीचं बोलणं, वागणं, तिचे हावभाव, तिचं बघणं, राग व्यक्त करण्याची पद्धत, तिचा अबोला आणि तिचा साधेपणा – हे सगळं खूप सूक्ष्म आहे. या सगळ्याची तयारी करणं माझ्यासाठी सध्या तारेवरची कसरत आहे. पण ही भूमिका करताना मला खूप आनंदही मिळतो आहे. मला हळू बोलायचं आहे, शब्दांचा तोल राखायचं आहे आणि वागताना स्वतःला ओव्हर दाखवायचं नाही. साध्या मुलीची भूमिका करणं सोपं वाटत असलं तरी माझ्यासाठी ते आव्हानात्मक आहे. मी खूप मेहनत घेत आहे आणि ती प्रेक्षकांना नक्की दिसेल. प्रोमोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे – मी कशी दिसेन आणि प्रेक्षकांना कितपत आवडेन याची. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील”.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या दोन वर्षांनी पहिल्यांदा सासरी गेली सुप्रसिद्ध क्रिकेटरची पूर्वाश्रमीची पत्नी, स्वतःच शेअर केले फोटो, सासू आणि…

शेवटी अभिनेत्री म्हणाली, “प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही सर्वजण पहिल्यांदा भेटलो तेव्हा एपिसोडचं वाचन होतं. तेव्हाच सगळ्यांची ओळख झाली. माझ्या बहिणींच्या भूमिका करणाऱ्या मानसी आणि सलोनी खूप छान आहेत. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी असं वाटलं की आपण खूप दिवसांपासून एकत्र काम करत आहोत. संपूर्ण टीम पहिल्याच दिवशी खूप छान मिसळून गेली”. ‘दीपज्योती’ मालिका १३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता तुम्हाला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Tags: Deepjyoti serialmarathi serialPurva Kaushik
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Yogesh Bhosale Struggle

"काळा नायक नाही चालत", नायक होण्याच होतं स्वप्न, मराठी अभिनेत्याची न ऐकलेली बाजू, म्हणाला, "नोकरी नसल्याने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.