बॉलिवूडमध्ये एककीडे अभिनेत्रींमध्ये कॅट फाइट्स पाहायला मिळते.मात्र मराठी मनोरंजन विश्वात कॅट फाईट नाही तर मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये मैत्री पाहायला मिळते.अशा अनेक मराठमोळ्या अभिनेत्री आहेत ज्यांच्यात घट्ट मैत्री आहे.यापैकी एक नाव म्हणजे मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. ती अँड ती, मितवा या चित्रपटात त्यांनी एकत्र काम देखील केलं आहे. या दोघी अनेकदा एकमेकांसाठी स्पेशल पोस्ट लिहीत एकमेकांचं कौतुक देखील करतात. पण आता प्रार्थनावर सोनाली नाराज झाली आहे.(Prarthana Behere Sonalee kulkarni)

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.ती सध्या तिचा स्वतःचा वेळ एन्जॉय करताना दिसून येते. माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील तिची नेहा ही भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या मालिकेने काही महिन्यापूर्वी निरोप घेतला, तेव्हापासून प्रार्थना qulaity टाइम स्पेंड करताना दिसते. तर सध्या सोशल मीडियावर तिचे गोव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.
प्रार्थनावर नाराज झाली सोनाली(Prarthana Behere Sonalee kulkarni)
प्रार्थना ही गोव्यात तिच्या मैत्रिणींसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते.तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती गर्ल्स गँगसोबत फुल तू मस्ती करत असून तिचे ट्रीपचे फोटो पाहून चाहते देखील कमेंट करत आहेत. तर शिवाय यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं देखील कमेंट केली आहे. सोनालीनं म्हटलं आहे की, ‘तुझे याद न मेरी आये..’. म्हणजेच तुला माझी आठवण आली नाही का..असा प्रश्नचं सोनालीनं तिच्या लाडक्या आणि जवळच्या मैत्रिणीला केला आहे.(Prarthana Behere Sonalee kulkarni)
====
हे देखील वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये श्रेया बुगडेने घेतली सागर कारंडेची जागा
====
“नाही ग डार्लिंग आपण पुन्हा येऊ ना फक्त आतापण दोघी” असं उत्तर दिल आहे. तर प्रार्थना हि गोव्याला सोनाली सोबत गेली नाही म्हणून, सध्या सोनाली नाराज झाली आहे.प्रार्थना बेहरे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघींची मैत्री जगजाहीर आहे.प्रार्थनाने सोनालीच्या लग्नासाठी देखील परदेशात गेली होती.नालीच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमात प्रार्थनानं नवऱ्यासोबत हजेरी लावली होती. या शिवाय अनेकदा सोनाली प्रार्थनाची माझी तुझी रेशीमगाठच्या सेटवर देखील जाऊन भेट घ्यायची. या वरूनच यांच्यात चांगली मैत्री असल्याचं समजतं.