शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्हाला मूल नको…” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य; म्हणाली, “आमच्या कुटुंबियांना वाटतं की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 8, 2023 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prarthana behere says that we do not want child

Prarthana behere says that we do not want child

मराठी मनोरंजनसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतीच ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त ती बऱ्याचशा वैयक्तिक आयुष्याबाबतच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असते. (Prarthana behere says that we do not want child)

प्रार्थना नुकतीच मुंबई सोडून अलिबागला शिफ्ट झाली आहे. तिने स्वतःचं युट्युब चॅनल सुरु केलं. त्यावरून तिने आपल्या अलिबागच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. त्याचबरोबर ती स्वतःच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य करताना दिसते. तिच्या आयुष्याबद्दलची बरीचशी गुपितं ती या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकतंच तिने आपल्या व्हिडिओतून त्यांना मूल नको असल्याबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – लंडनमधील थंडीमुळे ‘अशी’ झाली कलाकारांची अवस्था, व्हिडिओ शेअर करत स्वप्निल जोशी म्हणाला, “पॅकअपनंतर जेवायला गेलो आणि…”

तिने युट्युबवर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात तिने तिच्या अलिबागच्या घराची झलक दाखवली. त्याचबरोबर तिने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. “तुमचे कुटुंबीय तुमच्याबद्दल सर्वात जास्त कोणत्या गोष्टीबाबत बोलत असतात”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा प्रार्थना उत्तर देत म्हणाली, “आमच्या कुटुंबियांना वाटतं की माझ्या व अभिच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत. आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की आम्हाला मूल नको आहे पण आम्हाला आमचे श्वान आहेत तिच आमची मुलं आहेत. याबद्दल माझे व अभिचे विचार इतके सारखे आहेत तर हेच आमच्या कुटुंबाला आवडतं. आम्ही खूप खेळकर कपल आहोत. आम्ही भांडत नसतो आमची नेहमी मजामस्ती चालू असते”, असं सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

आणखी वाचा – Video: प्रार्थना बेहरने सोडली मुंबई, ‘या’ ठिकाणी बांधलं आलिशान घर, तिथेच स्थायिक झाली अभिनेत्री, म्हणाली, “मुंबई सोडून…”

प्रार्थनाने अभिषेक जावकर याच्यासोबत २०१७मध्ये लग्नगाठ बांधली होती. अभिषेकही दिग्दर्शक-निर्माता आहे. नुकतंच हे जोडपं मुंबई सोडून अलिबागला कायमचं स्थायिक झालं आहे. अलिबागमधील आलिशान घरात दोघंही छान वेळ घालवत आहेत. तेथील आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे व्हिडिओ व फोटो वेळोवेळी ती चाहत्यांना शेअर करताना दिसत आहे.

Tags: marathi actressprarthana behere
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Suhas joshi talk about reema lagoo last wish

“नेमकं त्याच दिवशी आमच्या घरातलं…”, रिमा लागू यांची ‘ती’ इच्छा पूर्ण न करू शकल्याची सुहास जोशी यांना खंत, म्हणाल्या, “रिमा तुझ्यासाठी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.