बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : विलासराव देशमुख पहिल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा व्हिडीओ रितेशने केला शेअर, म्हणाला, “माझ्या वडिलांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 18, 2024 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actor Riteish Deshmukh shared a post on the occasion of 25 years since his father Vilasrao's first Swearing as Chief Minister.

विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला २५ वर्षे पूर्ण होताच रितेशने शेअर केली खास पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. राजकारणातले राजहंस अशी ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांची भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची सामान्यांना भुरळ पडत असे. विलासराव देशमुख हे विरोधी पक्षातही लोकप्रिय होते. सरपंच म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या विलासरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय मंत्री असा प्रवास केला. १९७४ पासून राजकारणात पाऊल ठेवलेल्या विलासरावांनी नंतर  कधीच मागे वळून कधी पाहिले नाही. (Vilasrao Deshmukh First Chief Minister Swearing)

ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदापासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासरावांनी मुख्यमंत्री पदापर्यंत आपला राजकीय प्रवास केला. १९९५ च्या निवडणुकीत त्यांचा ३५,००० च्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर सप्टेंबर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून राज्य विधानसभेवर पुन्हा निवडून आले आणि सलग दोन निवडणुकांमध्ये सुमारे ९१,००० च्या फरकाने विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले, जे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मग १८ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज या घटनेला २५ वर्षे झाली आहेत. याचनिमित्ताने विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘पाऊस’ वेबसीरिजमधील ट्वीस्ट आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अजूनही सायलीला विशालची आठवण, पुढे काय घडणार?

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या पत्नीसह अनेक व्हिडीओ शेअर असतो. अशातच त्याने वडिलांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या शपथविधीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने शपथ घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “२५ वर्षांपूर्वी १८ ऑक्टोबर १९९९  रोजी माझ्या वडिलांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली”. रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : सूरज चव्हाण व गौतमी पाटीलची भेट, व्हॅनिटी व्हॅनमध्ये रंगल्या गप्पा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं अमित व धीरज देशमुख यांनी काँग्रेसची भक्कम साथ दिली आहे. पण रितेशने सक्रीय राजकरणात सहभाग न घेता मनोरंजन सृष्टीत आपली वेगळी वाट निवडली आहे.  त्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. अभिनेता व दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका त्याने पर पडल्या आहेत. रितेश राजकारणात नसला तरी अनेकदा तो राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करत असतो.

Tags: riteish deshmukhVilasrao Chief Minister Swearing Newsvilasrao deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Malaika Arora

"वेळीच गोष्टी समोर आल्या आणि…", अर्जुन कपूरबरोबरच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली मलायका अरोरा, म्हणाली, "आयुष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.