मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अनेक धाटणीच्या भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचं मनोरंजन करते, यासोबत प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून ती तिच्या हटके अदांनी चाहत्यांना भुरळ घालते. यासोबत ती अनेकदा फिटनेसचे धडे देखील चाहत्यांना देत असते.(prajakta mali)
प्राजक्ता ही सोशल मीडियावर अष्टांग योगा करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते, त्यावरून चाहते तिचं कौतुकदेखील करतात. पण यावेळी तिने शेअर केलेल्या योगा व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली.
प्राजक्ता आज सकाळी १०च्या सुमारास लाईव्ह आली होती, यावेळी ती योग करताना दिसली. हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. परंतु, या व्हिडीओमुळे प्राजक्ताला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. प्राजक्ताने व्हिडीओची सुरुवात इंग्रजीमधून केल्याचं तिच्या चाहत्यांना खटकल्याचं दिसत आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून ती नेहमी हटके पोजमध्ये फोटो शेअर करते, तर तिने शेर केलेल्या या व्हिडिओवर काने कमेंट करत “मराठी बोला असं सगळ्यांना सांगता आणि तुम्ही काय करता मग” असं म्हटलं . तर दुसऱ्याने “सुरुवात मराठीत केली असती तर खूप छान वाटलं असतं”, अशी कमेंट केली .
तर एका नेटकऱ्याने “मॅडम, मराठीमधून बोला नाहीतर तुम्हाला कोणी बघणार नाही” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “१० वाजता कोणता योगा असतो, सूर्य डोक्यावर आला” असंही एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने “१ तास ४० मिनिटांचा व्हिडीओ आम्ही बघावा अशी अपेक्षा आहे का तुमची” अशी कमेंट केली आहे. “विना मेकअपची दारू प्यायल्यासारखी वाटत आहे”, असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला ट्रोल केलं आहे.
====
हे देखील वाचा –खारी-बिस्किटाच्या पॅकेटवर अंतराचा फोटो: एक वेगळंच स्वप्न झालं पूर्ण
====
यासोबत प्राजक्ता तिच्या हटके पोजमुळे देखील ट्रॉल होत असते,पण तरीही तिच्या अभिनयाचे अनेक चाहते असून तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तर प्राजक्ता सध्या रानबाजार या वेब सिरीजमध्ये एका बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली. तर तिने नुकतंच प्राजक्ताराज या दागिन्यांच्या ब्रँड सुरु केला आहे