‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. कॉमेडीचं अचूक टायमिंग जुळवत ही कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत. (gaurav more onkar raut friendship)
या कलाकारांचं सेटवर, या कार्यक्रमादरम्यान वा स्कीटदरम्यान असलेलं बॉण्डिंग ही तितकंच स्ट्रॉंग आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या कार्यक्रमातील एक जोडी म्हणजे अभिनेता गौरव मोरे आणि अभिनेता ओंकार राऊत. यांची ही जोडगोळी तर प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका चुकवतेच, तर ही जोडगोळी खऱ्या आयुष्यातही तितकीच घट्ट आहे. (gaurav more onkar raut friendship)

फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून गौरव मोरेने आजवर साऱ्या प्रेक्षकवर्गाला हसवून सोडले. अल्पावधीतच गौरवने कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलं. विनोदाचं अचूक टायमिंग आणि त्याची हेअरस्टाईल त्याला लोकप्रिय करत गेली. तर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत ओंकार राऊतनेही चांगलाच कल्ला केलेला पाहायला मिळतोय. ओंकारच्याही विनोदाचं टायमिंग कमाल आहे. दादरचा अमोल पालेकर अशी ओळख असलेला ओंकार हास्यजत्रेत धुमाकूळ घालत असतो. गौरव आणि ओंकारच्या मैत्रीबद्दल बोलायचं तर त्यांच्यातील मैत्री ही घट्ट आहे. याची प्रचिति ही त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर येतेय.
====
हे देखील वाचा – आत्ता ‘या’ कारणानेही प्राजक्ता माळी झाली ट्रोल
====
नक्की काय घडला किस्सा (gaurav more onkar raut friendship)
काही दिवसांपूर्वी ओंकार राऊतने नवी बाईक खरेदी केली त्यावेळी चक्क गौरव मोरे ने संपूर्ण सेटवर १ किलो पेढे वाटले, तर ज्यावेळी ओंकारची जुनी बाईक हरवली होती तेव्हा गौरवने पाव किलो पेढे वाटले होते. याबाबत बोलताना गौरव मोरे ओंकारला शुभेच्छा देत असे म्हणाला की, ‘ओंकारने नवी बाईक घेतली आहे, आज मी पुन्हा पेढे घेऊन आलोय, सर्वांना वाटलेत, आणि मी माझा दिलेला शब्द पूर्ण केला आहे’. गौरवने ओंकारच्या सुखात आणि दुःखात ही पेढे वाटले आहेत, यावरून त्यांच्यातील मैत्री दिसून येते. गौरव आणि ओंकार कायमच एकमेकांना सल्ले देत असतात त्यांनी एकमेकांना दिलेले हे सल्ले त्यांच्या करियरमध्ये त्यांना कायम उपयोगी पडतात. (gaurav more onkar raut friendship)

फिल्टरपाड्याचा बच्चन आणि दादरचा अमोल पालेकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौऱ्या आणि ओंक्याची मैत्री हास्यजत्रेच्या सेटवर जशी आहे तशीच खऱ्या आयुष्यातही असल्याचे पाहायला मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून गौरव आणि ओंकार प्रेक्षकांना खळखळून हसविण्यास नेहमीच तत्पर असतात.