मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्रीने मालिका,चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखील काम केलं आहे. ती संध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसून येते. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा रियालिटी शो जगभरात प्रसिद्ध झाला. या शो मधील प्राजक्ता माळी आता पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेत दिसणार आहे. पारगाव मध्ये आता पूजा गायकवाड येणार आहे. दिसायला गोड,स्वभावाने कडक अशी हि पूजा पोस्टऑफिसमध्ये बेधडकपणे एन्ट्री करणार आणि पोस्टातील कर्मचाऱ्यांना मदत करणार. याचा एक प्रोमो देखील नुकताच समोर आला, यात प्राजक्ता ही सायकलवर एन्ट्री करताना पाहायला मिळत असून तिचा यात रेट्रो लूक देखील पाहायला मिळतोय.(Prajakta Mali)

या वर्षी पोस्ट ऑफिस उघड आहे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत हास्यजत्रेतील अनेक हास्यवीर पाहायला मिळतात.ही एका वेगळा धाटणीची मालिका असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवलेल्यांसाठी या मालिकेची झलक जुन्या काळाची आठवण करून देते. तर दुसरीकडे तरुणांनी तो काळ अनुभवला नाही त्यांच्यासाठी ही मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. तर आता पोस्टात पूजाच्या एन्ट्रीने काय घडणार ही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.(Prajakta Mali)
====
हे देखील वाचा –हॅशटॅगमुळे प्रियदर्शनी-ओंकरच्या फोटोची रंगली चर्चा
====

जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. आता पुन्हा एकदा प्राजक्ता छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. यासाठी तिचे चाहते खूप आनंदी झालेत. या प्रोमोवर देखील अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत प्राजक्ता अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमधून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करते.यासोबत प्राजक्ताने तिचा प्राजक्तराज नावाचा दागिन्यांचा ब्रँड देखील सुरु केला असून तिच्या या दागिन्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.