Pooja Sawant Home : अभिनयाने व सौंदर्याने कायमच प्रेक्षकांमध्ये मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजाने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या सौंदर्याने तिने तरुणाईला घायाळ केलं आहे. इतकचं नव्हे तर पूजाच्या नृत्याचेही लाखो दिवाने चाहते आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. पूजा तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळाली. लग्नानंतरही ती बरीच चर्चेत असते. नेहमीच सासर, माहेरचे आणि मित्र परिवाराबरोबरचे फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
पूजा सावंतच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजा व सिद्धेशने उरकलेल्या बॉलिवूड स्टाईल लग्नाने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. लग्नाबरोबरच पूजा व सिद्धेशच्या साखरपुडा, हळदी, मेहंदी, संगीत सोहळ्याचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा व सिद्धेश लग्नानंतरचे त्यांचे दिवस एन्जॉय करताना दिसले. पूजाचा नवरा हा कामानिमित्त ऑस्ट्रेलिया येथे आहे. त्यामुळे लग्नानंतर पूजाही नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली होती. पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे.
आणखी वाचा – “माणूस सरड्यासारखा रंग बदलतो आणि…”, पत्नी सुनीता आहुजाच्या बोलण्याने गोविंदा नाराज, काय आहे भांडणाचे कारण?
सिद्धेश ऑस्ट्रेलियात राहत असून तो केवळ कामानिमित्त भारतात येतो. तर पूजादेखील कामातून वेळात वेळ काढून नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये राहताना दिसते. अशातच आता पूजा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला सिद्धेशला भेटायला गेली आहे. यावेळी पूजा एकटी गेली नसून ती तिचे आई-वडील आणि बहीण-भावासह ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पूजाचे आई-बाबा आणि भावंडं पहिल्यांदाच तिच्या ऑस्ट्रेलियाच्या घरी पोहोचले आहेत.
आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! ‘दहावी-अ’ वेबसीरिज ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, उत्सुकता वाढली
याचे व्हिडीओ पूजाची बहीण रुचिराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये पूजाचं घर पाहून तिचे आई व बाबा खूप खुश दिसले. तसेच घरात जाऊन त्यांनी देवघराचे दर्शन घेतले. इतकंच नाही तर पूजा व सिद्धेश त्यांना घर दाखवतानाही एका व्हिडीओमध्ये दिसत आहेत. याचवेळी पूजा व सिद्देश यांच्या ऑस्ट्रेलियाच्या घराची झलक पाहायला मिळाली. प्रशस्त घर आणि सुंदर इंटेरिअर असलेलं हे घर साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.