मराठी सिनेमाविश्वात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत. सौंदर्यासह पूजा तिच्या अभिनयामुळेही चर्चेत असलेली दिसली. दगडी चाळ चित्रपटातील पूजाची भूमिका विशेष चर्चेत राहिली. तर चित्रपटातील कलरफुल या नावाने पूजाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनय, सौंदर्यामुळे चर्चेत असणारी पूजा काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. (Pooja Sawant Konkan Home)
सिनेमाविश्वात पूजा सावंतच्या लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लगीनगाठ बांधली. पूजा व सिद्धेशच्या बॉलिवूड स्टाईल लग्नाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अनेक कलाकार मंडळींच्या व जवळच्या नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत पूजा व सिद्धेशचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर पूजा बरीच चर्चेत राहिली. चव्हाणांच्या घरी पूजा रमलेलीही दिसली. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या सासू-सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवसही दणक्यात साजरा केला.

यानंतर आता पूजाच्या इन्स्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावरही पूजा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच सध्या पूजा तिच्या कोकणातील गावी पोहोचली असल्याचं समोर आलं आहे. पूजा तिच्या आई-बाबा, भाऊ-बहिणीसह कोकणात गेली आहे. विमानाने प्रवास करतानाचा एकत्र एक फोटो त्यांनी शेअरही केला आहे.

याशिवाय पूजाची बहीण रुचिरा हिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पूजाच्या गावच्या घराची झलकही पाहायला मिळाली आहे. होम स्वीट होम असं कॅप्शन देत तिने गावच्या छोट्याश्या सुंदर अशा घरची झलक दाखविली आहे. या स्टोरीमध्ये कोकणातील सुंदर अशा निसर्गाचे दर्शन घडत आहे. पावसामुळे मळभ झालेल्या या वातावरणात कोकणातील वातावरण प्रसन्न वाटत आहे. पूजाच्या माहेरच्या गावची झलक पाहणं रंजक ठरत आहे. घरासमोर काम सुरु असून झाड लावणार असल्याचंही दिसत आहे. सध्या पूजा तिच्या कुटुंबासह कोकणात एन्जॉय करत आहे.