सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : घर सोडून गेल्या एजेंच्या सूना, सेटवरचा व्हिडीओ आला समोर, नक्की कॅमेऱ्यामागे घडलंय काय?

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 9:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla fame Actress Sharmila Shinde shared a funny video on the song Azadi from the Hiramandi series.

Video : घर सोडून गेल्या एजेंच्या सूना, सेटवरचा व्हिडीओ आला समोर, नक्की कॅमेऱ्यामागे घडलंय काय?

संजय लीला भन्साळींच्या हिरामंडी या सीरिज धुमाकूळ घातला असून सध्या सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये या सीरिजची चर्चा सुरु आहे. या सीरिजशिवाय या सीरिजमधील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे. या सीरिजमधील गाणी ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘सकाळ बन’ आणि ‘तिलमी बहन’ या गाण्यांबरोबरच या सीरिजमधील ‘आझादी’ हे गाणंही चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

या सीरिजमधील गाण्यांवर सोशल मीडियाकर अनेक रील व्हिडीओ बनत आहेत. अनेक कलाकार व सोशल मीडिया वापरकर्ते या सीरिजमधील गाण्यावर व्हिडीओ करत आहेत. अशातच झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील एजेंच्या सूनांनी ‘आझादी’ या गाण्यावर रील व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये एजेच्या सूना हातात बॅग्स घेऊन घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sharmila Rajaram Shinde (@sharmilarajaramshindeactor)

सोशल मीडियावर या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेक नेटकऱ्यांनी एजेंच्या सूनांचा हा व्हिडीओ आवडल्याचे कमेंट्समध्ये म्हटले आहे. मालिकेत नुकतंच एजेची आई लीलाबरोबर घर सोडून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एजेच्या आईने एजेला तुला तुझ्या सूना जशा प्रिय आहेत, तशीच माझी सून मला प्रिय आहे असं म्हटलं होतं. 

आणखी वाचा – झी मराठीच्या मालिकांमधील लग्नात एकच भटजी, प्रेक्षकांनीच ओळखली ‘ती’ गोष्ट, म्हणाले, “आधी एजे-लीलाचं लग्न नंतर…”

मालिकेच्या याच कथानकाचा धागा कायम ठेवत मालिकेतील या कलाकारांनी हा रील व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शर्मिला शिंदेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘एजेंच्या सूना त्यांच्या ‘आझादी’च्या शोधात’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “ही मुलगी डोक्यात जाते”, मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?

“हा व्हिडीओ बघून पुन्हा पुन्हा हसत आहे, तुम्ही खूपच क्रिएटिव्ह आहात, हसणं रोखू शकत नाही, खूपच कमाल, खूपच भारी” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओमुळे आता मालिकेच्या प्रेक्षकांना या मालिकेच्या पुढील कथानकाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: marathi entertainment newsNavri Mile HitlerlaSharmila Shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
shalin bhanot update

शालीन भानोतला एकचवेळी चावले २०० विंचू, आता अशी झाली आहे अभिनेत्याची अवस्था, मात्र लोकांनी उडवली खिल्ली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.