बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आनंदी पुन्हा ये”, ‘मन धागा धागा’ने घेतलं सहा वर्षांचं लीप, मयुरी देशमुखच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “आनंदी-सार्थकची जोडी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2024 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
man dhaga dhaga jodate nava

"आनंदी पुन्हा ये", 'मन धागा धागा'ने घेतलं सहा वर्षांचं लीप, मयुरी देशमुखच्या एन्ट्रीनंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, "आनंदी-सार्थकची जोडी…"

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते’ नवा या मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अचानक सहा वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळत आहे. अचानक पुढे सरकलेल्या या कथानकाने साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. मालिकेत आनंदीने भावासाठी आणि सार्थकच्या आईने घातलेल्या अटींसाठी सार्थकपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदी मालिकेत दिसत नसतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख साकारत आहे. (man dhaga dhaga jodate nava)

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेचा नवा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीलाच सार्थक असं म्हणताना दिसत आहे की, गेल्या सहा वर्षात मी पहिल्यांदाच तुमच्या नावाने देवाला फुल वाहायला विसरलो आनंदी. त्यानंतर सार्थक फुलवाल्याकडे गुलाबाचं फुल मागतो. पण फुलं संपलेली असतात असं फुलवाला सांगतो. तितक्यात तिथे एका पात्राची एन्ट्री होते. तिच्या पुष्पगुच्छातील एक फुल काढते आणि “एक फुल चालेलं?”, असं ती सार्थकला विचारते. तेव्हा सार्थक ते फुल घेतो आणि पैसे देतो. पण सुखदा पैसे नाकारते आणि म्हणते, “एक स्माइल द्या आणि थँक्यू म्हणा”.

आणखी वाचा – “कुळकर्णी व मासे कसे खाता?”, पापलेट, कोळंबी, खेकडे खाण्यावरुन नीना कुळकर्णींना नेटकऱ्यांनी सुनावलं, यामध्ये अभिनेत्रीचं चुकलं काय?

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

त्यावेळी सार्थक तिला फक्त थँक्यू म्हणतो. त्यावर सुखदा विचारते आणि स्माइल?. सार्थक म्हणतो, “काही कारण वगैरे पाहिजे ना हसायला”. तेव्हा सुखदा म्हणते, “एकदा हसून तर बघा. आनंदी व्हाल”. मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षक कमेंट करत आनंदीबाबत विचारपूस करताना दिसत आहेत. “आनंदी कुठे गेली तीच चांगली होती”, “आनंदी पुन्हा ये”, “आनंदी कुठे आहे”, “आनंदी सार्थकची जोडी मस्त आहे”, “आनंदी व सार्थकमुळे मालिका बघायला छान वाटत”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – “कुळकर्णी व मासे कसे खाता?”, पापलेट, कोळंबी, खेकडे खाण्यावरुन नीना कुळकर्णींना नेटकऱ्यांनी सुनावलं, यामध्ये अभिनेत्रीचं चुकलं काय?

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून मयुरी देशपांडे घराघरांत पोहोचली. आता मयुरी बऱ्याच वर्षांनी ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सुखदा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहा वर्षांनंतर या मालिकेतून पुन्हा एकदा मयुरी मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. मयुरीच्या मालिकेतील एन्ट्रीवर प्रेक्षक आनंदीबाबत चर्चा करताना दिसत आहेत.

Tags: man dhaga dhaga jodate navamarathi serialMayuri Deshmukhsarthak anandi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Myra Vaikul danced on pushpa 2 song angaaron saa sami netizens trolled her

"ही मुलगी डोक्यात जाते", मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.