शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ही मुलगी डोक्यात जाते”, मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 12, 2024 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Myra Vaikul danced on pushpa 2 song angaaron saa sami netizens trolled her

"ही मुलगी डोक्यात जाते", मायरा वायकुळच्या व्हिडीओवर नको नको त्या कमेंट, खरंच ट्रोल करणाऱ्यांना हे शोभतं का?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे बालकलाकार मायरा वायकुळ ही मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा बनली. छोटी परी म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मायरा मोठ्या पडद्यावरही झळकली. नुकतीच ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मायरा ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. तसेच तिचे गाण्यांवरचे अनेक व्हिडिओदेखील तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. पण अनेकदा ती ट्रोलही होते.

अशातच मायराने नुकताच ‘पुष्पा-२’मधील लोकप्रिय गाण्यावरचा तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘अंगारों सा सामी’ हे गाणं सोशल मीडिया सध्या तुफान व्हायरल होत असून या गाण्यावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर मायरानेही खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती पावसात भिजतानादेखील दिसत आहे. तिने या गाण्यावर नेहमीप्रमाणेच भन्नाट डान्स केला आहे. पण यावर पुन्हा काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. तिच्या डान्ससह, तिच्या वयावरुन, तिच्या बोलण्यावरुन तसेच ती या वयात करत असलेल्या कामावरुनदेखील तिला ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायराच्या या व्हिडीओवर एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “वयापेक्षा मोठी होत आहे, अभ्यासात लक्ष दे. अशा रिल्समध्ये टाईमपास करुन काही होणार नाही” तर आणखी एकाने “चल आता बस झालं. मोठी झालीस, हे बंद कर आणि शाळेत जा” असं म्हटलं आहे. तसेच एकाने “ही मुलगी डोक्यात जाते” अशीही एक कमेंट केली आहे. मायरा तिच्या लहानपणात काम करून पैसे कमावत असल्याबद्दलही तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

याबद्दल एकाने कमेंट करत “पैशासाठी लहान मुलीला पावसात भिजून नाचवणाऱ्या पालकांवर कारवाई करा. गणपती बाप्पा अशा पालकांना नक्कीच शिक्षा देईल”. अशी कमेंट केली आहे. तसेच सततच्या ट्रोलिंगमुळे एकाने कमेंट करत “मायराचे आई-वडील तुम्ही कमेंट बंद करा. मायराबद्दलच्या अनेक वाईट कमेंट्स बघून वाईट वाटतं” असं म्हटलं आहे. तसेच अनेकांनी मायराला पाठींबा देत लहान आहे ती, लहान मुलांना पावसात भिजायला आवडतच आणि पावसात भिजून तिने व्हिडीओ केला तर काय हरकत आहे. लहान मुलांना तरी सोडा रे” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचे निधन, कुटुंबीय हळहळले, व्यक्त केलं दुख

मात्र या अशा नकारात्मक कमेंट्स करणे हे नेटकऱ्यांना खरंच शोभतं का? मायराने आपल्या अभिनयाने अवघ्या लहान वयात इतकी लोकप्रियता व प्रसिद्धी मिळवली आहे. लहान वयात तिने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र हीच गोष्ट काही जणांना खटकत असून याबद्दल तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टवर चार चांगल्या कमेंट्सनंतर खूप साऱ्या नकारात्मक कमेंट्स असतात.

एवढ्या लहान मुलीला सोशल मीडियावर अशाप्रकारे ट्रोल करणे हे खरंच गरजेचं आहे का? असा प्रेक्षक व एक माणूस म्हणून विचार करणे गरजेचं आहे. या वयात तिने तिच्या अंगभूत कलांनी व अभिनय कौशल्याने आतापर्यंत मिळवलेले यश हे नकारात्मक कमेंट केलेल्यांपैकी कुणी कमावले असेल असं नाही. त्यामुळे एक सजग व संवेदनशील माणूस म्हणून प्रत्येकाने लहान मुलीवर कमेंट करण्याआधी थोडा विचार करणे गरजेचे आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsmyra vaikulMyra Vaikul Troll
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
naseeruddin shah on pm narendra modi

"मुसलमानांनी हिजाब व सानिया मिर्झाच्या स्कर्टची चिंता करु नये", नसीरुद्दीन शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, "मुसलमानांच्या मनात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.