मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना परदेश, ना पर्यटन स्थळ; शशांक केतकर फिरण्यासाठी बायकोसह पोहोचला ठाण्यातील ‘या’ ठिकाणी, म्हणाला, “‘होणार सून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 17, 2024 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar Post

ना परदेश, ना पर्यटन स्थळ; शशांक केतकर फिरण्यासाठी बायकोसह पोहोचला ठाण्यातील 'या' ठिकाणी, म्हणाला, "'होणार सून..."

सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता शशांक केतकर याने त्याच्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री या पात्रामुळे शशांकला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय शशांक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. (Shashank Ketkar Post)

करण जोहरच्या ‘शो टाईम’ या आगामी प्रोजेक्टमध्ये शशांक महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं त्याने या पोस्टद्वारे सांगितलं. सोशल मीडियावर ही शशांक बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच कोणत्या ना कोणत्या विविध सामाजिक मुद्द्यांवर व वैयक्तिक गोष्टींबाबत तो भाष्य करत प्रेक्षकांना अपडेट देत असतो. बरेचदा सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केल्याने अभिनेत्याला टोलही केले गेलं आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता शशांक नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देतानाही दिसला आहे.

आणखी वाचा – ‘शिवराज रामराज्याचं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, अंगावर काटा आणणारं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्तुतीगीत तुम्ही पाहाच

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

अशातच शशांकने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत सुट्टीच्या दिवशी शशांक ठाण्यात फेरफटका घेत असल्याची ही पोस्ट त्यांने शेअर केली आहे. काही वर्षांपूर्वीच शशांक त्याची मैत्रीण प्रियंका ढवळेसह लग्न बंधनात अडकला. दोघांना आता एक मुलगा देखील आहे. प्रियंका व शशांक एकमेकांबरोबरचे अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. अशातच शशांक प्रियांकासह ठाण्यातील रस्त्यांवर फेरफटका मारायला गेला असल्याचं त्यांने या पोस्टमधून सांगितले आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं या ठाण्यातील बऱ्याचशा गोष्टींच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

शशांकने सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या सुट्टीचा आनंद घालवताना दिसत आहे. या पोस्ट खाली कॅप्शन देत त्यांने असं म्हटलं आहे की, “कधी कधी आपण आपल्याच शहरात फिरायचं विसरतो. काल सुट्टी मिळाली. ठरवून मी व प्रियांका अगदी ऋग्वेदच्या वयाचे होऊन आमच्या ठाण्यात फिरलो. मी इयत्ता दहावीपर्यंत ठाण्यात होतो. शाळेत असताना मित्रांबरोबर तलावपाळीला यायचो. राम मारुती रोडवर फिरायचो, भेळ खायचो, मिसळ खायचो. त्यानंतर ‘होणार सून मी या घरची’ मालिकेचं अनेकदा शूटिंगही इथेच केलं. काल त्या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देता आला.” असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

Tags: entertainmentmarathi actorshashank ketkarshashank ketkar instagramshashank ketkar post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Prasad Khandekar Post

धमाल-मस्ती, चेहऱ्यावरील आनंद अन्…; प्रसाद खांडेकरची बायको व लेकाचा पहिला परदेश दौरा, फोटो शेअर करत म्हणाला, "कुटुंबाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.