मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिवराज रामराज्याचं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, अंगावर काटा आणणारं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्तुतीगीत तुम्ही पाहाच

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 16, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shivraj Ram Rajyacha song on Chhatrapati Shivaji Maharaj produced by Its Majja Original and Media One Solutions is released today

‘शिवराज रामराज्याचं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, अंगावर काटा आणणारं छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्तुतीगीत तुम्ही पाहाच

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या प्रत्येक कणावर कायमचे कोरले गेलेले नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ३५० वर्षांनंतर आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक डोंगर-दऱ्या, कड्या-कपारीमधून हिंडणारा मोकळा वारा अन् गडकोटांवरची माती छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या निष्ठावान मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच पराक्रमाचे व शौर्याचे स्मरण म्हणून दरवर्षी मोठ्या आनंदात व जल्लोषात शिवजयंती साजरी केली जाते.

सालाबादप्रमाणे येत्या १९ फेब्रुवारीलाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे आणि याच शिवजयंतीचे औचित्य साधून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून ‘इट्स मज्जा ओरिजिनल’ व ‘मीडिया वन सोल्यूशन’ प्रेक्षकांसाठी ‘शिवराज रामराज्याचं’ हे स्तुतीगीत घेऊन आले आहेत.

“आलं आलं आलं रं आलं राजं आलं, छत्रपती शिवराज, रामराज्याचं” हे या स्तुतीगीताचे शब्द असून शाहीर प्रसाद विभूते यांनी हे गाणं गायले आहे. तर गीत व संगीतही त्यांनीच दिले आहे. त्याचबरोबर या गाण्यासाठी त्यांना सत्यशील बोरवणकर, हृषीकेश केळकर, भाग्यश्री अभ्यंकर व मयुरा काळे या गायकांची साथ लाभली आहे. अशातच यंदाच्या शिवजयंतीच्या दोन दिवस आधी आज १६ फेब्रुवारी ‘शिवराज रामराज्याचं’ हे स्तुतीगीत प्रदर्शित करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘शिवराज रामराज्याचं’ या सबंध गाण्यासाठी लाईन आर्ट्स या खास चित्रण शैलीचा वापर करण्यात आला असून हे लाईन आर्ट्स संदीप घोडके यांनी साकारले आहे. तर ‘मीडिया वन सोल्युशन्स’ आणि शौरिन दत्ता यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. तसेच अंकिता लोखंडे यांनी क्रिएटीव्ह हेड आणि जैमिन शिगवण व अनंत श्रीवास्तवा यांनी या गाण्यासाठी प्रोजेक्ट हेडची जबाबदारी पार पाडली आहे.

Tags: Ashvini Mahangade On Chhatrapati Shivaji Maharajchatrapati shivaji maharajchhatrapati shivaji jayantichhatrapati shivaji maharajchhatrapati shivaji maharaj 2024chhatrapati shivaji maharaj jayantichhatrapati shivaji maharaj songchhatrapati shivaji maharaj speechshivaji maharajshivaji maharaj jayantishivaji maharaj jayanti songshivaji maharaj songshivjayantishivjayanti 2024Shivraj Ram Rajyacha song
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Marathi actresses Pooja Sawant and Siddhesh Chavan's engagement ceremony done

मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.