स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मल्टीस्टारर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ असं या मालिकेचं नाव आहे. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अशा दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. जवळपास चार वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. (Mrunal dusanis on her daughter reaction)
अभिनेत्री भारतात परतल्यापासून सर्वत्र तिच्या पुनरागमनाची तुफान चर्चा होती. अखेर गणेशोत्सवात मृणाल ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं या मालिकेत नंदिनी मोहिते पाटील असं तिच्या व्यक्तिऱेखेचं नाव असून समाजकार्याची आवड असणारी आणि सतत इतरांच्या हितासाठी झटणारी तिची व्यक्तिरेखा आहे. प्रोमो पाहिल्यानंतर मृणालच्या अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्याचप्रकारे तिच्या लेकीनेही आईला टीव्हीवर पाहताच क्षणी आनंद व्यक्त केला होता.
आपल्याला टीव्हीवर बघून लेकीने कए प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल मृणालने भाष्य केलं आहे. मज्जा पिंक’ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने असं म्हटलं की, “मुलीने प्रोमो पाहिला आहे आणि मला टीव्हीवर पाहिल्यावर ती खूप आनंदी होती. आई तू आली? तू तिथे गेलीस? कशी गेलीस? आणि मग तू तिकडे गेली होतीस का? तिच्या चेहऱ्यावर कायम उत्सुकता असते. मालिकेचा प्रोमो लागला आणि ती जर कुठे आत असेल तर धावत येऊन टीव्हीसमोर उभी राहते. माझ्यासाठी ही खूप म्हणजे खूप आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss 18 ‘या’ दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, तारीखही आली समोर, जाणून घ्या…
दरम्यान, मृणालची ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही नवीन मालिका येत्या १६ डिसेंबरपासून संध्याकाळी ६ वाजता प्रसारित केली जाणार आहे. ही नवीन मालिका तामिळ मालिका ‘ऐरामना रोजवे’ची रिमेक असल्याचे म्हटलं जात आहे. आता या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार? आणि मृणाल पुन्हा आपल्या चाहत्यांची मनं जिंकयात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.