टेलिव्हिजनवरील नेहमीच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस. यंदाचे ‘बिग बॉस हिंदीचे १८वे पर्व आहे. ६ ऑक्टोबरला मोठ्या धूमधडाक्यात हा शो सुरु झाला. एकूण १८ स्पर्धकांनी स्पर्धकांनी या घरात प्रवेश केला होता, ज्यात ९० च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ते टीव्ही अभिनेता विवियन डीसेना आणि करणवीर मेहरा यांसारख्या नावांचा समावेश होता. शोच्या प्रीमियरला जबरदस्त रेटिंग मिळाली आणि सीझन हिट झाला. ‘बिग बॉस १८’ हा शो टॉप-१० यादीत कायम आहे. ऑक्टोबरमध्ये सुरु झालेला ‘बिग बॉस १८’ आता हळूहळू ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे आणि त्याची तारीखही समोर आली आहे. (Salman Khan Bigg Boss 18 will end soon)
‘बिग बॉस तक’ ने सलमान खान ‘बिग बॉस १८’ च्या विजेत्याची घोषणा कोणत्या दिवशी करणार आणि त्याचा ग्रँड फिनाले कधी होणार याची माहिती दिली आहे. या शोचा फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा कोणतीही सूचना दिली नाही. मात्र, करणवीरने नुकतेच एका एपिसोडमध्ये सांगितले होते की, आता अजून पाच आठवडे बाकी आहेत. त्यानुसार पाच आठवड्यांनंतरची तारीख १९ जानेवारी आहे.

‘बिग बॉस १८’ मधून आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले स्पर्धक आहेत – गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बॅनर्जी, शहजादा धामी, अरफीन खान, एलिस कौशिक आणि अदिती मिस्त्री. तजिंदर बग्गा यांनाही घरातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता ‘बिग बॉस 18’ मध्ये राहिलेल्या स्पर्धकांमध्ये विवियन दसना, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, ईशा सिंग, रजत दलाल, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, सारा अरफीन खान, यामिनी, चुम दरंग, दिग्विजय राठी, इडन आणि श्रुतिका यांचा समावेश आहे.
जर या बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले येत्या १९ जानेवारीला होणार असेल तर मग एकूण पाच आठवडे बाकी आहेत आणि १४ स्पर्धक घरात आहेत. त्यानुसार, दर आठवड्याला किमान दोन एलिमिनेशन होऊ शकतात, जेणेकरुन बिग बॉस १८चे टॉप-६ अंतिम स्पर्धक मिळतील. त्यामुळे आता हे टॉप-६ कोण असणार? आणि या शोचं विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.