दंगल’, ‘पीके’, ‘तलाश’, ‘गजनी’, ‘तारे जमीन पर’, ‘थ्री इडियट्स’, ‘लगान’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता म्हणजे आमीर खान. त्याने अनेक हिट व गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा पडता काळ सुरु झाल्याचे जाणवत आहे. आमीर खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट हा ‘लाल सिंग चड्ढा’ होता. अलीकडेच तो मुंबईत ‘इल्लू इल्लू 1998’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला होता. यावेळी आमीरची मुलगी आयरा खानची सासूही प्रीमियरला पोहोचली होती आणि यावेळी आमीरने लेकीच्या सासूसाठी केलेल्या वर्तणूकबद्दल नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. (Aamir Khan help the daughter girl’s mother-in-law)
गेल्या काही दिवसांपासून ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाची चर्चा सुरू होती. या सिनेमाचा ग्रँड प्रीमियरला सोहळा नुकताच पार पडला. या ग्रँड प्रीमियरला बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खान देखील हजर होता. या कार्यक्रमाचे अनेक फोटो, व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हायरल व्हिडीओमध्ये आमीर खान लेकीच्या सासूला गाडीतून उतरवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर चित्रपट करणार, मोठी घोषणा
या व्हिडीओमध्ये नुपूर शिखरेच्या आईला कारमधून खाली उतरण्यात अडचण येत होती, तेव्हा आमीर त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसला. या व्हिडीओमधील आमीरच्या कृतीचे पाहून अनेक नेटकरी अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. “आमीर खान मोठा अभिनेता असूनही त्याचा साधेपणा भावतो, “आमीर सामान्य माणसासारखा आहे”, “साधेपणात त्याच्या पुढे कोणी नाही”. अशा अनेक शब्दांत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – “माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”
मुंबईत झालेल्या ‘इल्लू इल्लू 1998’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये आमीर खान पायऱ्यांवर उभा राहून जावई नुपूर शिखरेबरोबरही पोज देताना दिसला. त्याच्या या व्हिडीओलाही नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच आमीरच्या जावईबरोबरच्या नात्याचेही अनेकांनी कौतुक केलं आहे. दरम्यान, आमीर लवकरच ‘सीतारे जमीन पर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयासोबतच तो या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहे.