अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. क्रांतीने आजवर अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या क्रांती चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. सोशल मीडियावरही क्रांती नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रांती सोशल मीडियावर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करताना दिसते. (Kranti Redkar Daughter)
क्रांती विशेषतः तिच्या लेकींमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरुन क्रांती तिच्या लेकींबरोबरचे अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. क्रांती तिच्या लेकींच्या अनेक करामती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. क्रांतीच्या लेकी या सोशल मीडियावर क्रांतीपेक्षा चर्चेत असतात. क्रांतीला जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. लाडाने क्रांती त्यांना छबिल व गोदो अशी हाक मारते. अशातच क्रांतीच्या लेकीने एक करामत केली असून क्रांतीने सोशल मीडियाद्वारे ती शेअर केली आहे.
क्रांती या व्हिडीओमध्ये सांगतेय की, “छबिलच्या बाथरुममध्ये खिडकी नाही म्हणून ती रडत आहे. तर काय करायचं. मी दोन ब्रश केव्हापासून हातात घेऊन दोघींना अंघोळीला जाऊया असं सांगत आहे. माझ्या बाथरुममध्ये खिडकी आहे आणि त्यांच्या बाथरुममध्ये खिडकी नाही म्हणून ती रडत आहे. लहान मुलांचे कशाहीबाबतीत मूड ऑफ होतात. त्यांचं बाथरूम खूप छान आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता छबिलची समजूत घालण्यासाठी आम्ही बाथरूममध्ये खिडकीचं चित्र काढून चिकटवलं आहे. या चित्रात निळं आकाश, झाड आणि भगव्या रंगाचा सूर्य आहे”, असं बोलताना दिसत आहे.
यावरुन क्रांतीचा आई म्हणून असलेला समजूतदारपणा पाहायला मिळत आहे. आई म्हणून नेहमीच क्रांती तिच्या लेकीची काळजी घेताना दिसते. अशातच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये क्रांतीने तिच्या मुलींची समजूत काढण्यासाठी शक्कल लढवलेली पाहायला मिळाली. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचं भरभरुन कौतुक केलं आहे.